Elon Musk School eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk School : आता शिक्षण क्षेत्रातही उतरणार इलॉन मस्क! शाळा-कॉलेज उभारण्याची सुरू आहे तयारी - रिपोर्ट

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इलॉन मस्क लवकरच टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरात एक शिक्षण संस्था स्थापन करणार आहे.

Sudesh

Elon Musk Educational Institute : ऑटोमोबाईल, स्पेस, टेक अशा सर्व क्षेत्रांमध्ये परवलीचा शब्द झालेली व्यक्ती म्हणजे इलॉन मस्क. या सर्व क्षेत्रांमध्ये मस्क केवळ उतरलाच नाही, तर त्या-त्या क्षेत्रात त्याच्या कंपन्या टॉपला पोहोचल्या आहेत. ब्लूमबर्गने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, मस्क आता शिक्षण क्षेत्रातही उतरण्याच्या तयारीत आहे.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इलॉन मस्क लवकरच टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरात एक शिक्षण संस्था स्थापन करणार आहे. याठिकाणी सुरुवातीला दहावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. तसंच भविष्यात या संस्थेची वाढ होऊन कॉलेजची स्थापना देखील केली जाऊ शकते, असंही यात स्पष्ट झालं आहे.

इलॉन मस्कने या शाळेसाठी एका नवीन उभारलेल्या चॅरिटीमध्ये तब्बल 100 मिलियन डॉलर्स दान केले आहेत. या नव्या संस्थेचे उद्दिष्ट विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांवर भर देऊन त्यासाठी एक अभिनव अभ्यासक्रम तयार करणे आहे. यामुळेच ही संस्था 'STEM' (Science, Tech, Engineering, Maths) या विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहे आणि त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार आहे.

स्कॉलरशिप देखील देणार मस्क

ब्लूमबर्गला एक टॅक्स फायलिंग रिपोर्ट मिळाली आहे. या रिपोर्टनुसार मस्कच्या या शाळेत सुरुवातीला 50 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांकडून कोणतीही ट्यूशन-फी घेतली जाणार नसल्याचंही यात म्हटलं आहे. तसंच, ट्यूशन-फी लागू केल्यास गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

2014 मध्ये उभारली होती खासगी शाळा

इलॉन मस्कने यापूर्वी 2014 साली आपल्या आणि आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 'एड एक्स्ट्रा' नावाची एक खासगी शाळा सुरू केली होती. यामध्ये पारंपारिक गुण प्रक्रियेला टाळून, मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना इव्हॅल्युएट केलं जातं. म्हणजेच, या शाळेत मुलांना मार्क किती मिळतात यापेक्षा त्यांच्या कलागुणांना कसा वाव दिला जाईल याकडे लक्ष दिलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT