X Hate Speech eSakal
विज्ञान-तंत्र

X Hate Speech : 'एक्स'वरील सुरक्षा रामभरोसे? ट्रोलिंग कंट्रोल करणाऱ्या 1,000 कर्मचाऱ्यांना मस्कने दाखवला घरचा रस्ता!

Elon Musk X : सोशल मीडियावरील हेट कंटेंट कमी करण्यासाठीच आपण 'ट्विटर' विकत घेतलं, असा दावा मागे इलॉन मस्क यांनी केला होता.

Sudesh

Elon Musk Sacks X Employees : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर मोठ्या प्रमाणात हेट कंटेंट आणि स्पॅम होत असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. हा हेट कंटेंट कमी करण्यासाठीच आपण 'ट्विटर' विकत घेतलं, असा दावा मागे इलॉन मस्क यांनी केला होता. मात्र, आता हेट कंटेंट कंट्रोल करण्यासाठी नेमलेल्या पथकातील तब्बल 1,213 कर्मचाऱ्यांना मस्कने घरचा रस्ता दाखवला आहे.

इलॉन मस्कने (Elon Musk) एक्स विकत घेतल्यानंतर काही महिन्यांमध्ये ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे. ईसेफ्टी कमिशनने ही आकडेवारी जारी केली आहे. इलॉन मस्कने एक्सच्या हजारो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत काढून टाकलं आहे. मात्र, ट्रोलिंग कंट्रोल टीममधील कर्मचाऱ्यांची कपात केल्यामुळे एक्सला मोठा फटका बसू शकतो.

ऑनलाईन ट्रोलिंग, हेट स्पीच (Hate Speech on X) यावर नियंत्रण ठेवणाऱ्या टीममधील कर्मचारी कमी झाल्यामुळे आता हा प्लॅटफॉर्म लोकांच्या वापरासाठी सुरक्षित राहिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या निर्णयामुळेच गेल्या काही महिन्यांमध्ये एक्सवरील ट्रोलिंग आणि हेट कंटेंट वाढला असल्याचं ऑस्ट्रेलियन वॉचडॉगने म्हटलं आहे.

ईसेफ्टी कमिशनने (ESafety Commission) यापूर्वी चाईल्ड पॉर्नोग्राफी कंटेंटमध्ये वाढ झाल्यामुळे एक्सला दंड ठोठावला आहे. कंपनीला यावेळी 3,88,000 डॉलर्स एवढा दंड भरावा लागला होता. कंपनीने अद्याप हा दंड भरला नसून, या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या सगळ्यातच आता ट्रोलिंग कंट्रोल करणारे कर्मचारी कमी झाल्यामुळे एक्सवरील सुरक्षा रामभरोसेच असल्याचं म्हटलं जात आहे.

80 टक्के सॉफ्टवेअर इंजिनिअर बाहेर

ऑस्ट्रेलियन वॉचडॉगने दिलेल्या रिपोर्टनुसार, एक्सचे सुमारे 80 टक्के सॉफ्टवेअर इंजिनिअर बाहेर गेले आहेत. यातील कित्येकांना कंपनीने काढून टाकलं आहे, तर कित्येकांनी स्वतःच राजीनामा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I: इशान किशनचं वादळ... ११ चौकार अन् ४ षटकार! सूर्या दादासोबत १२२ धावांची भागीदारी अन्...

Pune Grand Tour: ''सायकल स्पर्धेमुळे पुण्यातील वाहतुकीवर फारसा ताण नाही'', पुणे पोलिस नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर

MSCE Exam 2026 : प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची विभागीय स्पर्धा परीक्षा ३-४ फेब्रुवारीला ऑनलाईन

Pune Crime News : ई-सिगारेट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रेत्यांवर छापे, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT