Elon Musk on COVID Vaccine eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk on COVID Vaccine : 'कोविड लसीमुळे आली होती रुग्णालयात जायची वेळ', इलॉन मस्कचा खळबळजनक दावा!

COVID Vaccine : लस न घेणाऱ्या कंपनीतील चांगल्या लोकांना काढून टाकण्याऐवजी मी तुरुंगात जाणं पसंत केलं असतं; असंही मस्क म्हणाले.

Sudesh

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आणि एक्स कंपनीचे (ट्विटर) मालक असलेल्या इलॉन मस्कने एक खळबळजनक दावा केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे आपल्यावर रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली होती, असं मस्कने म्हटलं आहे.

इलॉन मस्कने आपल्या एक्स हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसींची परिणामकारकता कशी 100 टक्क्यांवरून कमी होत होत ती 20 टक्क्यांवर आली आहे, हे सांगणाऱ्या हेडलाईन्स दिल्या आहेत. 'तुम्हाला हे माहिती आहे का?' असंही मस्कने यूजर्सना विचारलं आहे.

अनिवार्य करणं विचित्र

याच थ्रेडमध्ये मस्क म्हणतात, की कोविड प्रतिबंधात्मक लसी घेणं अनिवार्य करणं हे अगदी विचित्र होतं. बायडेन यांनी दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने रोख लावली, अन्यथा लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्देश स्पेस एक्स किंवा इतर कंपन्यांना दिले गेले असते.

"अर्थातच, आम्ही असं काही केलं नसतं. लस न घेणाऱ्या कंपनीतील चांगल्या लोकांना काढून टाकण्याऐवजी मी तुरुंगात जाणं पसंत केलं असतं." असंही मस्क म्हणाले.

रुग्णालयात जायची वेळ

"मला कोरोनाची कोणतीही लस येण्यापूर्वीच त्याची लागण झाली होती. त्यावेळी प्रवास करण्यासाठी अनिवार्य असल्यामुळे मला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे तीन डोस घ्यावे लागले होते. तिसऱ्या डोसनंतर माझ्यावर जवळपास रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली होती."

"ज्या लोकांना अजूनही कोरोनाची लक्षणं दिसत आहेत; ती खरंच आजारामुळे आहेत, की लसीमुळे किंवा कोरोनाच्या उपचारांमुळे?" असा प्रश्नही मस्क यांनी उपस्थित केला.

लसींवर आहे विश्वास

मस्क पुढे म्हणतात, की "माझा लसींवर नक्कीच विश्वास आहे. मात्र, उपचार हा आजारापेक्षा भयानक असू शकत नाही. लसीच्या प्रभावीपणाबाबत सुरू असलेली चर्चा थांबवू नये. सिंथेटिक mRNA वापरूनही मोठ्या प्रमाणात आजार बरे केले जाऊ शकतात. त्यामुळेच, एखादी वाईट गोष्ट टाकून देण्याच्या घाईत चांगली गोष्टही फेकून देण्याची घाई करू नये."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT