X Update Esakal
विज्ञान-तंत्र

X Update: इलॉन मस्कचा मोठा धक्का! एक्सवर पोस्ट, लाईक अन् रिप्लायसाठी द्यावे लागणार पैसे

X Update: इलॉन मस्क याने सोशल मिडीया एक्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. इलॉन मस्कला विश्वास आहे की, पैसे द्यावे लागल्यानंतर बॉट्स आणि बनावट खात्यांवरील पोस्ट कमी होतील, बॉट्स थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

X Update: इलॉन मस्कने एक्स पुर्वीचे ट्विटर विकत घेतल्यापासून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. जेव्हापासून इलॉन मस्क X (पूर्वीचे ट्विटर) चे मालक बनले, तेव्हापासून त्याचे संपूर्ण लक्ष X मधून पैसे कमविण्यावर केंद्रित आहे. प्रथम इलॉन मस्कने X च्या ब्लू टिक घेण्यासाठी पैसे भरावे लागणार असल्याचे जाहीर केले. ब्लू टिक याआधी मोफत उपलब्ध होती आणि त्यासाठी काही अटी होत्या. इलॉन मस्कने मालक झाल्यानंतर, ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर आता इलॉन मस्कने एक्सच्या नवीन वापरकर्त्यांसाठी एक मोठा प्लॅन आखला आहे. इलॉन मस्क यानी म्हटले आहे की, X वर येणाऱ्या नवीन वापरकर्त्यांना पोस्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील आणि ती रक्कम नाममात्र असेल, त्यांनी किती पैसे द्यावे लागणार हे अद्याप स्पष्टपणे सांगितले नाही.

इलॉन मस्कचा विश्वास आहे की, पैसे द्यावे लागल्यानंतर बॉट्स आणि बनावट खात्यांवरील पोस्ट कमी होतील, कारण सध्या कोणीही नवीन खाते तयार करत आहे आणि कोणाच्याही बाजूने पोस्ट करत आहे. इलॉन मस्क यानी सांगितले आहे की बॉट्स थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

X च्या नवीन धोरणानुसार X वर पोस्ट करणे, एखाद्याच्या पोस्ट लाइक करणे, पोस्ट बुकमार्क करणे आणि पोस्टला उत्तर देणे यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तुम्ही फक्त एक खाते मोफत फॉलो करू शकाल. एक्सवरील स्पॅम अकाऊंट आणि इतर गोष्टींना रोखण्यासाठी याबाबत दीर्घकाळापासून चाचपणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवनराजेंना मारलं कुणी? पद्मसिंहांच्या लेकानं १९९० ते २००९ पर्यंतचं राजकारण काढलं बाहेर, षडयंत्र असल्याचा आरोप

Railway Fine: बिनतिकीट प्रवाशांवर मोठा दणका! नियम मोडल्यास दुप्पट पैसे आकारणार; रेल्वे प्रशासनाकडून नवे दंड जाहीर

बरं झालं मी 'वाजले की बारा' नाही केलं नाहीतर... अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य; अमृता खानविलकरचे चाहते संतापले, म्हणाले- मॅडम

Flying Flea C6 : बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच; 154KM रेंज, रॅपिड चार्जिंग अन् किंमत फक्त...

Latest Marathi Live Updates:श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे 17 वर्षीय तरुणावर चाकुने प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT