Twitter Elon Musk X eSakal
विज्ञान-तंत्र

Twitter Elon Musk : इलॉन मस्कने 'ट्विटर' विकत घेऊन झालं एक वर्ष! नाव अन् लोगो सोडून 365 दिवसांत काय काय बदललं?

X One Year : गेल्या वर्षी एक्स विकत घेतल्यानंतर मस्कने 'दि बर्ड इज फ्री' असं ट्विट केलं होतं.

Sudesh

इलॉन मस्कने गेल्या वर्षी ट्विटर हे अ‍ॅप विकत घेतलं होतं. तब्बल 44 बिलियन डॉलर्सना ही डील पार पडली होती. यानंतर मस्कने ट्विटरमध्ये कित्येक बदल केले. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे, ट्विटरचं नाव आणि लोगो बदलून 'एक्स' करणे हा होता.

गेल्या वर्षी एक्स विकत घेतल्यानंतर मस्कने 'दि बर्ड इज फ्री' असं ट्विट केलं होतं. यावर्षी मस्कने हेच ट्विट रिपोस्ट करत 'फ्रीडम' असं म्हटलं आहे. यासोबतच मस्कने या वर्षभरात एक्समध्ये काय बदल झाले हेदेखील शेअर केलं आहे.

डोग डिझायनर या एक्स हँडलवरुन एक भली मोठी यादी पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये एका वर्षात एक्सने घेतलेले मोठे निर्णय सांगितले आहेत. तसंच या अ‍ॅपने मिळवलेल्या विविध अचीव्हमेंट्स देखील यात सांगण्यात आल्या आहेत. (Tech News)

ट्विटरमध्ये झाले 'हे' बदल -

  • 'एक्स' असं रीब्रँडिंग झालं.

  • ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग लाँच.

  • लाईव्ह स्ट्रीमिंग क्वालिटी सुधारली.

  • क्रिएटर्ससाठी अ‍ॅड रेव्हेन्यू शेअर प्रोग्राम लाँच केला, आणि त्यांना 20 मिलियन डॉलर्स दिले. यामुळे जूननंतर क्रिएटर्सची संख्या 10 पटींनी वाढली.

  • कम्युनिटींचा अ‍ॅप टाईम 300 टक्क्यांनी वाढला.

  • दररोज 1.5 मिलियन नवे यूजर्स आले. (गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% वाढ.)

  • यूजर्स आधीच्या तुलनेत 14% अधिक वेळ अ‍ॅपवर व्यतीत करु लागले.

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत व्हिडिओ व्हूअरशिप 90 टक्क्यांनी वाढली.

  • जॉब-रिक्रुटमेंट फीचर लाँच केले.

  • ग्रुप चॅटची मर्यादा 200 यूजर्सपर्यंत वाढवली.

  • पोस्ट एडिटिंग फीचर दिले.

  • पोस्ट रिपोर्टिंग प्रक्रिया सोपी केली.

  • ब्लॉक फीचर काढून टाकले.

  • ग्रुप कॉलिंग फीचर लाँच केले.

  • लिंकमधील हेडिंग्स काढून टाकले, ज्यामुळे यूआय अनुभव सुधारला.

  • अनव्हेरिफाईड यूजर्सना निर्बंध लागू केले.

  • वेबवर आयडी व्हेरिफिकेशन उपलब्ध केले.

  • लाईक्स-सबस्क्राईबर्स हाईड करता येतात.

  • स्पॅम कमी केले. 90 टक्के बॉट अकाउंट्स डिलीट केले.

यासोबत अन्य कित्येक घोषणांची एक संपूर्ण यादीच या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. इलॉन मस्कने ही पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. सोबतच, काही प्रश्न असल्यास ते कमेंटमध्ये विचारण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT