Starlink Satellite Crash eSakal
विज्ञान-तंत्र

Starlink Satellite Crash : इलॉन मस्क पृथ्वीवर पाडणार तब्बल 100 उपग्रह; वातावरणावर काय होणार परिणाम?

Elon Musk : मस्कची स्पेस एक्स कंपनी या सर्व उपग्रहांना आपल्या कक्षेतून बाजूला काढून खाली पाडणार आहे. पृथ्वीच्या वातावरणामध्ये घर्षण होऊन हे उपग्रह जळून नष्ट होतील.

Sudesh

Elon Musk to Crash 100 Starlink Satellites : इलॉन मस्कने सॅटेलाईट इंटरनेट पुरवण्यासाठी 'स्टारलिंक'च्या माध्यमातून कित्येक उपग्रह अवकाशात लाँच केले आहेत. यातील सुमारे 100 उपग्रह येत्या सहा महिन्यांमध्ये पृथ्वीवर खाली पाडण्यात येणार आहेत. हे सॅटेलाईट भविष्यात फेल होऊन इतर उपग्रह किंवा रॉकेटना अडचण निर्माण करू शकतात. त्यामुळे यांना डी-ऑर्बिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मस्कची स्पेस एक्स कंपनी या सर्व उपग्रहांना आपल्या कक्षेतून बाजूला काढून खाली पाडणार आहे. पृथ्वीच्या वातावरणामध्ये घर्षण होऊन हे उपग्रह जळून नष्ट होतील. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणावर मोठा परिणाम होणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. (Elon Musk Starlink) आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हवा प्रदूषण

जेव्हा अवकाशातून कोणतीही वस्तू पृथ्वीवर पडत असले, तेव्हा तिला वायुमंडळातील विविध लेअर्समधून प्रवास करावा लागतो. यावेळी होणाऱ्या घर्षणामुळे ती वस्तू पेट घेते. जेव्हा धातूपासून तयार झालेले उपग्रह अशा प्रकारे पेट घेतात, तेव्हा त्यातील धातूचे अतिसूक्ष्म कण हवेमध्ये मिसळले जातात. यामुळे हवा प्रदूषणाचा धोका वाढतो.

ओझोन लेअर

पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मोठ्या प्रमाणात सॅटेलाईट्स उपलब्ध आहेत. एकट्या स्टारलिंक कंपनीचेच तब्बल 5,000 उपग्रह याठिकाणी फिरत असतात. या उपग्रहांचे कण हे पृथ्वीचं सुरक्षा कवच असणाऱ्या 'ओझोन'च्या थराचं नुकसान करत असल्याचंही यापूर्वी स्पष्ट झालं आहे.

लाकडी सॅटेलाईट

या समस्येवर उपाय म्हणून अमेरिकेची नासा आणि जपान मिळून एक लाकडी उपग्रह तयार करत आहेत. संपूर्ण लाकडापासून तयार करण्यात आलेला हा उपग्रह पृथ्वीवर कोसळला, तरी वातावरणात तो जळून नष्ट होईल. लाकडापासून बनलेला असल्यामुळे, या उपग्रहाच्या राखेतून कोणतेही घातक कण किंवा पदार्थ बाहेर पडणार नाहीत. यावर्षीच्या मध्यापर्यंत या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT