Elon Musk Sues Open AI eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Sues Sam Altman : चॅटजीपीटी बनवणाऱ्या 'Open AI' कंपनीला इलॉन मस्कने खेचलं कोर्टात; सॅम अल्टमनसोबत कशामुळे वाजलं?

Musk Sues Open AI : 2015 साली सॅम, ग्रेगरी आणि मस्क या तिघांनी मिळून ओपन एआय कंपनीची सुरुवात केली होती.

Sudesh

Elon Musk sues Open AI Over breach of Contract : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपन एआय कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. यासोबत त्यांनी ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांच्यावरही मोठे आरोप केले आहेत. कंपनीने आपल्यासोबत केलेल्या कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप मस्कने केला आहे. (Tech News)

काय आहे प्रकरण?

Open AI कंपनीचे संस्थापक सॅम अल्टमन आणि ग्रेगरी ब्रॉकमॅन यांनी कंपनीच्या स्थापनेवेळी इलॉन मस्कची मदत मागितली होती. यावेळी त्यांनी म्हटलं होतं; की ही एक 'नॉन-प्रॉफिट' कंपनी असेल, जी मानवजातीच्या कल्याणासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी डेव्हलप करेल. ही कंपनी नफा कमावण्याचा विचार करणार नाही, या अटीवरच इलॉनने कंपनीच्या स्थापनेसाठी मदत केली होती; असं मस्कच्या वकिलांनी म्हटलं आहे.

कंपनीने मोडला करार

इलॉन मस्कने आरोप केले आहेत, की ओपन एआय कंपनी आता पूर्वीप्रमाणे नॉन-प्रॉफिट राहिलेली नाही. कंपनी नफ्यावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आपल्यातील मूलभूत कराराचं उल्लंघन झालं आहे. मस्कने यापूर्वी आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत बोलत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्याने कंपनीला थेट कोर्टात खेचलं आहे.

Screengrab of Elon Musk's X post

इलॉन मस्कने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये Sam Altman, Gregory Brockman यांची नावं प्रामुख्याने घेतली आहेत. ओपन एआयमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) काही अधिकाऱ्यांची नावंही यामध्ये घेण्यात आली आहेत.

मस्कनेच दिलं ओपन-एआय नाव

2015 साली सॅम, ग्रेगरी आणि मस्क या तिघांनी मिळून ओपन एआय कंपनीची सुरुवात केली होती. ही कंपनी नफ्याचा विचार करणार नाही, आणि लोकांसाठी काम करेल म्हणून इलॉन मस्कनेच याचं नाव 'ओपन' एआय असं ठेवलं होतं. मस्कने स्वतःच ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. (Elon Musk named Open AI)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT