Elon Musk X TV App eSakal
विज्ञान-तंत्र

X TV App : आता यूट्यूबचा बाजार उठवणार इलॉन मस्क? लवकरच येणार 'एक्स'चं टीव्ही अ‍ॅप, पाहता येणार मोठे व्हिडिओ

Elon Musk : काही दिवसांपूर्वीच आपण जीमेलच्या तोडीचं एक्स-मेल अ‍ॅप बनवणार असल्याचं मस्कने घोषित केलं होतं.

Sudesh

Elon Musk to Launch X TV App : 'एक्स', म्हणजेच ट्विटरला एव्हरिथिंग अ‍ॅप बनवण्यासाठी इलॉन मस्क सातत्याने प्रयत्न करत आहे. आतापर्यंत एक्सवर कॉलिंग फीचर, जॉब सर्च फीचर असे बरेच फीचर देऊन मस्कने विविध कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वीच आपण जीमेलच्या तोडीचं एक्स-मेल अ‍ॅप बनवणार असल्याचं मस्कने घोषित केलं होतं. या सगळ्यात आता एक्सने आपलं टीव्ही अ‍ॅप लाँच करण्याची तयारी केली आहे. पुढील आठवड्यात हे लाँच होईल, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

डोजडिझायनर (DogeDesigner) या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. "एक्सवर असणारे तुमचे आवडते मोठे व्हिडिओ आता तुम्ही थेट आपल्या टीव्हीवर पाहू शकणार आहात" असं एका एक्स पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. यासोबत असलेल्या फोटोमध्ये एका टीव्हीवर एक्स अ‍ॅप (X App on TV) देखील दिसत आहे.

मस्कला कमाईची मोठी संधी

या टीव्ही अ‍ॅपसाठी इलॉन मस्कने (Elon Musk) अमेरिकेतील दोन कंपन्यांशी पार्टनरशिप केली आहे. एक्सचं टीव्ही अ‍ॅप हे यूट्यूबसारखंच असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे एक्सवर असणारे मोठे व्हिडिओ थेट टीव्हीवर पाहता येतील. या अ‍ॅपच्या माध्यमातून मस्कला जाहिरातींसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. ही कमाईची मोठी संधी असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अर्थात, टीव्ही अ‍ॅपच्या मॉनिटायझेशनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एक्सवर पोस्ट करता येतात मोठे व्हिडिओ

इलॉन मस्कने एक्स विकत घेतल्यानंतर त्यामध्ये कित्येक मोठे बदल केले होते. यामध्येच एक मोठा अपडेट म्हणजे आता यूजर्सना या प्लॅटफॉर्मवर अगदी दोन तासांपर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करता येत आहेत. हे फीचर केवळ प्रीमियम यूजर्सना उपलब्ध आहे. मात्र, यामुळे कित्येक कंटेंट क्रिएटर्समध्ये एक्स लोकप्रिय होत आहे.

लाईक्स अन् कमेंट्सचा आकडा लपणार?

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजूनही काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार एक्स पोस्टवरील लाईक्स आणि कमेंट्सचा आकडा आता लपण्याची शक्यता आहे. अर्थात, याबाबत अद्याप कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, असं झाल्यास कित्येक यूजर्स नाराज होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT