X Ads Revenue eSakal
विज्ञान-तंत्र

X Ads Revenue : 'एक्स'वरुन पैसे कमावणं आता आणखी सोपं! नियमांमध्ये केले मोठे बदल; इलॉन मस्कची घोषणा

Elon Musk : यापूर्वीच्या नियमांनुसार, पैसे कमावण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीत १५ मिलियन ट्विट इम्प्रेशन गरजेचे होते.

Sudesh

इलॉन मस्कने काही दिवसांपूर्वी 'एक्स' (ट्विटर) प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅड्स रेव्हेन्यू प्रोग्रामची घोषणा केली होती. या माध्यमातून यूजर्सना ट्विटरवरुन पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करण्यात आली होती. आता याबाबतचे नियम आणखी शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकाधिक यूजर्स सोप्या पद्धतीने पैसे कमावू शकणार आहेत.

५० लाख इम्प्रेशन्स

यापूर्वीच्या नियमांनुसार, पैसे कमावण्यासाठी यापूर्वी यूजर्सना अकाउंटवर कमीत कमी ५०० फॉलोवर्स, ब्लू टिक आणि तीन महिन्यांच्या कालावधीत १५ मिलियन ट्विट इम्प्रेशन गरजेचे होते. मात्र, आता ट्विट इम्प्रेशनची मर्यादा तीन महिन्यांत केवळ ५ मिलियन (५० लाख) इम्प्रेशन्स गरजेचे आहेत.

मिनिमल विड्रॉवल लिमिट

यापूर्वी यूजर्सना कमावलेले पैसे काढून घेण्यासाठी विड्रॉवल लिमिट ही ५० डॉलर्स होती. ती आता बदलून १० डॉलर्स करण्यात आली आहे. त्यामुळे यूजर्स आणखी लवकर आपले पैसे मिळवू शकतील. (Twitter News)

ठेवली मोठी अट

नियमांमध्ये बदल करण्यात आले असले, तरी मस्कने यात एक मोठी अटही ठेवली आहे. तीन महिन्यांमध्ये मिळालेले ५ मिलियन इम्प्रेशन्स हे केवळ व्हेरिफाईड अकाउंट्सने असायला हवेत. फ्री अकाउंट्सने मिळालेल्या इम्प्रेशन्सना यात मोजलं जाणार नाही. बॉट्स किंवा स्पॅमच्या मदतीने कोणी चीटिंग करू नये यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

अ‍ॅड रेव्हेन्यू प्रोग्राम हा केवळ ब्लू टिक असणाऱ्या यूजर्ससाठी असणार आहे. सोबतच, कमीत कमी ५०० फॉलोवर्स असण्याच्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ट्विटरवरुन (एक्स) पैसे कमावण्यासाठी तुम्हाला या अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT