Elon Musk Brazil
Elon Musk Brazil eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk : इलॉन मस्क पुन्हा गोत्यात! कोर्टाचे आदेश मानण्यास नकार; म्हणाला 'पैशांपेक्षा तत्व महत्त्वाचं'

Sudesh

Elon Musk Brazil Supreme Court : इलॉन मस्क आणि 'एक्स' (ट्विटर) हे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी एक्सच्या अधिकाऱ्यांनी ठराविक अकाउंट हटवण्यासाठी मोदी सरकार आपल्यावर दबाव आणत असल्याचं म्हटलं होतं. आता अशाच एका प्रकरणात इलॉन मस्कने ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाशी देखील पंगा घेतला आहे. यामुळे त्याला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

ब्राझील उच्च न्यायालयाने इलॉन मस्कला एक्सवरील काही पोस्ट आणि अकाउंट्स हटवण्यास सांगितले होते. मात्र, याला सपशेल नकार देत मस्कने कोर्टाची ऑर्डरच आपल्या अकाउंटवरुन पोस्ट करण्याची धमकी दिली. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अ‍ॅलेक्झँड्रे यांनी ब्राझीलचे नागरिक आणि संविधानाला दगा दिला आहे. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, किंवा त्यांना काढून टाकण्यात यावं अशी मागणी मस्कने केली.

पैशांपेक्षा तत्व मोठं

"ब्राझीलच्या लोकांना हक्क आहे की त्यांना पारदर्शकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं. या न्यायाधीशांनी एक्सवर मोठा दंड ठोठावला आहे. तसंच, ब्राझीलमधील आमच्या कर्मचाऱ्यांना अटक करून, देशात एक्सची सेवा ठप्प करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आम्हाला ब्राझीलमध्ये मोठं नुकसान होणार आहे. कदाचित तिथलं ऑफिसही आम्हाला बंद करावं लागेल. मात्र, पैशांपेक्षा तत्व अधिक महत्त्वाचं आहे." असं मस्कने म्हटलं आहे.

'व्हीपीएन'चा वापर करा

दरम्यान, इलॉन मस्क आणि ब्राझील सरकार यामधील तणाव वाढत असताना या देशात एक्सवर बंदी येईल अशी चिन्हं आहेत. यामुळे इलॉन मस्कने ब्राझीलमधील यूजर्सना व्हीपीएन वापरण्याचा सल्ला दिला आहे. व्हीपीएन वापरून एक्स कसं अ‍ॅक्सेस करता येईल याबाबत त्याने आपल्या एक्स हँडलवरुन माहिती दिली आहे.

मस्कवर होतेय टीका

ब्राझीलचे सॉलिसिटर जनरल जॉर्ज मेसिआस यांनी मस्कला चांगलंच धारेवर धरलं आहे. "आम्ही अशा समाजात राहू शकत नाही, जिथे बाहेरच्या देशात राहणाऱ्या अब्जाधीशांच्या हातात सोशल मीडियाचा कंट्रोल आहे. आणि हे अब्जाधीश कायद्याला न जुमानता उलट आमच्याच अधिकाऱ्यांना धमकी देत आहेत." अशी पोस्ट जॉर्ज यांनी केली होती. ब्राझीलच्या उच्च न्यायालयाने मात्र याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT