Elon Musk unveils enhanced monetization plans on X platform, promising higher payouts to content creators than YouTube.
esakal
Elon Musk statement for content creators on X platform : ‘कंटेट क्रिएटर्स’साठी एक आनंदाची बातमी आहे. अब्जाधीश उद्योजक इलॉन मस्क यांनी ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालमाल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. मस्क यांची कंपनी X ‘कंटेट क्रिएटर्स’ना ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा देण्याचा विचार करत आहे. खुद्द मस्क यांनी क्रिएटर्सना जास्त पैसे दिले जावे अशी मागणी करणाऱ्या एक पोस्टला उत्तर देताना याचे संकेत दिले आहेत.
एलोन मस्क यांनी X च्या प्रॉडक्ट हेड निकिता बियर यांना त्यांच्या पोस्टमध्ये टॅग करून म्हटले आहे की, "ठीक आहे, ते करूया, परंतु सिस्टममध्ये छेडछाड सहन केली जाणार नाही." निकिता बियर यांनी मस्क यांना उत्तर देताना म्हटले आहे की काम सुरू आहे. तसेच त्यांनी मस्क यांना उत्तर देताना असेही म्हटले आहे की, "आमच्याकडे एक आयडिया आहे जी 99 टक्के फसवणूकीचे प्रकार संपवेल."
निक शर्लीने X वर पोस्ट केले आहे की, "मी माझ्या मित्रांना अनेक महिन्यांपासून X वर पोस्ट करण्यास सांगत आहे, परंतु त्यांनी प्रयत्न केला नाही कारण त्यांचा वेळ इतर प्लॅटफॉर्मवर आर्थिकदृष्ट्या चांगला खर्च होतो." तर काही युजर्स या चॅटमध्ये सामील झाले आहेत आणि काहींनी हे गेम-चेंजर ठरणार असल्याचेही म्हटले आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर मूळ आणि एआय कंटेंटमध्ये स्पर्धा सुरू असताना मस्क यांनी क्रिएटर्सना जास्त पेमेंट देण्याबाबत संकेत दिले आहे. याचा अर्थ कंटेंट क्रिएटर्सकडे अधिक पैसे कमविण्याचा आणखी एक पर्याय लवकर उपलब्ध असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.