X Audio-Video Calling eSakal
विज्ञान-तंत्र

X Audio-Video Calling : इलॉन मस्क झाला उदार... 'एक्स'चं ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फीचर आता सर्वांसाठी मोफत!

X Calling Feature : एक्सचे इंजिनिअर एनरिक यांनी याबाबत घोषणा केली आहे. यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच 'एक्स' अ‍ॅपवरुनही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहेत.

Sudesh

X rolls out Audio-Video Calling Feature for everyone : इलॉन मस्कने काही दिवसांपूर्वी 'एक्स' अ‍ॅपवर ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच केलं होतं. सुरूवातीला केवळ ब्लू-टिक असणाऱ्या यूजर्सना ही सुविधा मिळत होती. मात्र आता सर्व यूजर्सना ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक्सचे इंजिनिअर एनरिक यांनी याबाबत घोषणा केली आहे. यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच 'एक्स' अ‍ॅपवरुनही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहेत. एक्सला 'एव्हरिथिंग अ‍ॅप' बनवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय.

एनरिकने आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितलं, की आम्ही नॉन प्रीमियम यूजर्ससाठी हे फीचर रोलआउट करत आहे. याच्या मदतीने आता सामान्य यूजर्सही एक्सवरुन कॉलिंग करू शकणार आहेत. जर तुम्हाला हे अपडेट अद्याप मिळालं नसेल, तर अ‍ॅप अपडेट करून पहा. तरीही हे फीचर मिळालं नसेल, तर तुम्हाला थोडं थांबावं लागेल. (X Calling feature)

मस्कने दिले होते संकेत

जानेवारीच्या अखेरीस इलॉन मस्कने याबाबत संकेत दिले होते. याआधी हे फीचर केवळ प्रीमियम यूजर्सना उपलब्ध होतं. त्यासाठी मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन घेण्याची गरज होती. मात्र, लवकरच हे फीचर मोठ्या स्तरावर रोलआऊट केलं जाईल असं इलॉनने म्हटलं होतं. यासाठी काही चाचण्या पार पाडण्यात आल्या, त्यानंतर आता हे फीचर टप्प्या-टप्प्याने सर्व यूजर्सना देण्यात येत आहे. (Elon Musk X)

पिन मेसेज अल्गोरिदम

दरम्यान इलॉन मस्कने एक्सबाबत आणखी एक घोषणा केली आहे. एक्सच्या रेकमंडेशन अल्गोरिदममध्ये बदल करण्यात येणार आहे. यामुळे आपल्या सर्व फॉलोवर्सना आपण पिन केलेली पोस्ट दिसणार आहे. दर 48 तासांमध्ये एकाच पिन पोस्टला हे लागू होईल, असंही मस्कने स्पष्ट केलं. (Elon Musk X Algorithm)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT