X Everything App eSakal
विज्ञान-तंत्र

X Everything App : आता 'एक्स'वर होणार व्हिडिओ गेम स्ट्रीमिंग अन् बरंच काही; एकाच अ‍ॅपमध्ये मिळणार सगळं!

X Video Game Streaming : इलॉन मस्कने स्वतःच व्हिडिओ गेम खेळत, याचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं.

Sudesh

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. मस्कने यूजर्सवर कित्येक प्रकारची बंधनं घातली आहेत, मात्र सोबतच यूजर्सना कित्येक नवीन फीचर्स देखील दिले आहेत. आज इलॉन मस्कने आणखी एका फीचरची चाचणी केली.

इलॉन मस्कने रविवारी डिएब्लो 4 डंजन ही गेम खेळत स्वतःला एक्सवर लाईव्ह स्ट्रीम केलं होतं. यानंतर आज पुन्हा एकदा अशा प्रकारची चाचणी घेण्यात आली. सुमारे 40 मिनिटं मस्कने हे लाईव्ह स्ट्रीम केलं होतं. या लाईव्ह स्ट्रीमला 1.5 व्ह्यूवर्स मिळाले.

यावेळी एक्स यूजर्सनी इलॉनला फीडबॅक देखील दिले. हाय-पीच व्हॉईस फ्रीक्वेन्सी, स्क्रीन फ्लिकरिंग अशा प्रकारच्या त्रुटी यूजर्सनी दाखवून दिल्या. इलॉनने देखील या त्रुटी मान्य करत, यावर अजून काम सुरू असल्याचं स्पष्ट केलं.

एक्स असणार एव्हरिथिंग अ‍ॅप

मस्कने यापूर्वीच म्हटलं होतं, की ट्विटर हे आता 'एव्हरिथिंग अ‍ॅप' असणार आहे. म्हणजेच, यामध्ये केवळ ट्विटरच नाही तर इतर अनेक अ‍ॅप्ससारखे फीचर्स मिळणार आहेत. ट्विटरवर सध्या मोठ्या लांबीचे व्हिडिओ पोस्ट करता येत आहेत, तसंच काही दिवसांमध्ये याठिकाणी जॉब रिक्रुटमेंट फीचरही लाँच होणार आहे.

एक्सवर ऑनलाईन पेमेंट ऑप्शन सुरू करण्याबाबत देखील काम सुरू आहे. तसंच, आता एक्सवर ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय देखील उपलब्ध करण्यात येणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT