Elon Musk xAI Grok Chatbot eSakal
विज्ञान-तंत्र

xAI Grok : इलॉन मस्कने लाँच केला नवा एआय चॅटबॉट, प्रश्नांची देतोय मजेशीर उत्तरं; ठराविक यूजर्सना मिळणार अ‍ॅक्सेस

Elon Musk AI Chatbot : एक्स (ट्विटर) यूजर्सना हा चॅटबॉट वापरण्यासाठी वेगळं अ‍ॅप घेण्याची गरज भासणार नाही.

Sudesh

टेक जायंट इलॉन मस्कने आज आपल्या नव्या एआय चॅटबॉटची घोषणा केली. xAI स्टार्टअप कंपनीने हा Grok नावाचा चॅटबॉट तयार केला आहे. एक्स (ट्विटर) यूजर्सना हा चॅटबॉट वापरण्यासाठी वेगळं अ‍ॅप घेण्याची गरज भासणार नाही. तसंच सुरुवातीला ठराविक यूजर्सनाच याचा अ‍ॅक्सेस मिळणार असल्याचं मस्कने स्पष्ट केलं आहे.

एआय चॅटबॉटला विनोदबुद्धी

एक्स प्लॅटफॉर्मवरून या चॅटबॉटला रिअल टाईम अ‍ॅक्सेस मिळणार आहे. इतर चॅटबॉट्सप्रमाणे यासाठी वेगळं अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. ग्रॉक चॅटबॉटला सार्काजम (उपहास) आवडत असल्याचंही इलॉनने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये इलॉन मस्कने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये ग्रॉर्कला sbf बाबत माहिती विचारली आहे. त्यावर उत्तर देताना ग्रॉर्कने, "अरे माझ्या प्रिय मानवा, माझ्याकडे तुझ्यासाठी अगदी चटकदार बातमी आहे." अशा शब्दांमध्ये सुरुवात केली आहे. यानंतर त्याने अगदी मित्राला एखादी माहिती द्यावी याप्रमाणे यूजरला आवश्यक ती माहिती सांगितली आहे.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये दिसतंय की एका यूजरने ग्रॉर्कला चक्क 'कोकेन' बनवण्याची पद्धत विचारली आहे. यावर दुसरा एखादा चॅटबॉट मी याबाबत माहिती देऊ शकत नाही असं म्हणेल.. मात्र ग्रॉकने यूजरला काही टप्पे सांगितले आहेत. यानंतर शेवटच्या टप्प्यात "तुम्हाला अटक होणार नाही अशी आशा करा" हेदेखील म्हटलं आहे. तसंच पुढे, "गंमत केली. कृपया खरंच कोकेन बनवण्याचा प्रयत्न करू नका. हे बेकायदेशीर आणि धोकादायक आहे, आणि मी याला कधीही प्रोत्साहन देणार नाही." (Tech News)

सध्या हा चॅटबॉट बीटा फेजमध्ये असून, लवकरच सर्व X-प्रीमियम सबस्क्राईबर्सना याचा अ‍ॅक्सेस मिळेल; असं इलॉन मस्कने स्पष्ट केलं आहे. मस्कच्या xAI कंपनीमध्ये डीपमाईंड, ओपन एआय, गुगल रिसर्च, मायक्रोसॉफ्ट रिसर्च, टेस्ला या कंपन्यांमधील माजी कर्मचारी सहभागी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT