Elon Musks Twitter vs Mark Zuckerbergs Threads sakal
विज्ञान-तंत्र

Elon Musks Twitter vs Mark Zuckerbergs Threads : थ्रेड्स घेऊ शकतं का ट्विटरची जागा? पाहा दोन्ही अँपमध्ये काय आहे फरक

लाँच झाल्यानंतर या अ‍ॅपचे गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरच्या माध्यमातून जगभरातून अवघ्या सात दिवसांत तब्बल १० कोटी युजर्स झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Elon Musks Twitter vs Mark Zuckerbergs Threads - इन्स्टाग्राम म्हटल तर सध्याच्या पिढीला सर्वात जास्त आवडणार ॲप. कधी रील्स तर कधी मिम्स, एखादा रील बघून इन्स्टाग्राम बंद करू म्हणत म्हणत कधी तासनतास निघून जातात पत्ताच लागत नाही.

एकाच्या स्टोरीवर फिरण्याचा मनमुराद आनंद घेतानाचे फोटो तर दुसऱ्याच्या स्टोरी वर हॉटेलमधले चटकदार पदार्थांचे फोटो.. हे सर्व सुरू असताना अचानक गुरुवारपासून इन्स्टाग्रामच चित्रच बदललं आणि त्यात सामिल झाली ती थ्रेड्स !

मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीने ६ जुलै रोजी नवीन थ्रेड्स ॲप लाँच करून एलॉन मस्कच्या ट्विटरला धडक दिली आहे. ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी थ्रेड़सने त्यांच्या ॲपमध्ये काही खास सुविधा युजर्ससाठी दिल्या आहेत.

लाँच झाल्यानंतर या अ‍ॅपचे गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरच्या माध्यमातून जगभरातून अवघ्या सात दिवसांत तब्बल १० कोटी युजर्स झाले आहेत. आता तर, इन्स्टाच्या स्टोरीजही थ्रेड़सवर पोचू लागल्या आहेत. त्यामुळे इन्स्टाचे युजर्स आपसूकच थ्रेड़सकडे आकर्षित झाले आहेत.

- कसे कराल साइन अप?

आयओएस (iOS) किंवा एंड्रॉइड (Android) स्मार्टफोनवर थ्रेड्स ॲप डाउनलोड करा

ॲप उघडा आणि "इन्स्टाग्राम सह लॉग इन करा" वर क्लिक करा

जर फोनवर इन्स्टाग्राम आधीच लॉग इन असेल तर ते आपोआप थ्रेड्सवर लॉग इन होईल

इन्स्टाग्राम नसल्यास, वेगळा आयडी-पासवर्ड तयार करून पुन्हा लॉग इन करावे लागेल

एक कोटींचा टप्प्या गाठण्यासाठी लागलेला कालावधी

थ्रेड्स अ‍ॅप - ७ तास

ट्विटर - २ वर्षे

फेसबुक - १० महिने

इन्स्टाग्राम - २.५ महिने

व्हॉट्सऍप - १ वर्ष

चॅट जीपीटी - ५ दिवस

नेटफ्लिक्स - ३.५ वर्षे

- थ्रेड्स ॲप ट्विटरची जागा घेईल का?

अवघ्या ७ दिवस १० कोटी डाऊनलोड्सचा आकडा पार केलेल्या थ्रेडस अ‍ॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे थ्रेड़स अल्पावधीतच ट्विटरची जागा घेईल, अशी चर्चा सोशल मीडियात आहेत. त्यावरून तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.

- ट्विटर आणि थ्रेड्स मधील काही मुख्य फरक

  • युजर्सला थ्रेड्सवर ५०० शब्दांची पोस्ट टाकता येते तर, ट्विटरवर जास्तीत जास्त २८० शब्द ट्विट करण्याची परवानगी आहे.

  • थ्रेड़स वापरण्यासाठी, युजर्सच्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम आवश्यक आहे. तर, ट्विटर कोणत्याही ॲपला लिंक करून प्रोफाइल तयार करीत नाही.

  • थ्रेड़सच्या युजर्सला ५ मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करता येतात तर, तर, ब्लू टिक नसलेले वापरकर्ते ट्विटरवर फक्त 2 मिनिटे २० सेकंदांचे व्हिडिओ पोस्ट करू शकतात.

  • ट्विटरचे मुख्यपृष्ठ युजर्सला ट्रेंडिंग काय आहे आणि त्यांना स्वारस्य असलेले इतर विषय दाखवितो तर, थ्रेड्सवर या बाबत सध्या कोणताही ऑप्शन नाही

थ्रेड्स ॲप हे वापरण्यासाठी सोपे आहे. त्यात ट्विटर सारखी वैशिष्ट्ये आहेत. परंतु, ट्विटरच्या तुलनेत थ्रेड्स वापरण्यासाठी सोपे आहे. त्यामुळेच अवघ्या काही तासांत थ्रेड़सचे लाखो डाउनलोड झाले.

मानसी टाटीया , थ्रेड्स युजर

विशिष्ठ ग्रुप किंवा फक्त एका व्यक्तिशी संपर्कात राहणे थ्रेड्समुळे सहज शक्य आहे. गोपनीयता आणि सुरक्षितता या ॲपमधे असल्यामुळे युजर्स विश्वासाने फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. एकूणच, थ्रेड्स हा एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम सोशल प्लेटफॉर्म आहे.

शिवम कुलकर्णी, थ्रेड्स युजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT