EV bike google
विज्ञान-तंत्र

EV bike : १ रुपयात ५ किमी चालेल ही स्कूटर; फक्त १० हजारांत आणा घरी

किंमत ५ किमी चालण्यासाठी फक्त १ रुपया असेल. ही स्कूटर फक्त १० हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता.

नमिता धुरी

मुंबई : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने तेजीत आहेत. अशा अनेक कंपन्यांनी त्यांची ई-वाहने एकापाठोपाठ एक लाँच केली आहेत. त्यामुळे बाजारपेठ ईव्हीने गजबजली आहे. कंपन्यांच्या ईव्हीच्या विक्रीत वाढ होण्यामागे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याचेही एक मोठे कारण आहे.

अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी अशाच एका स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याची किंमत ५ किमी चालण्यासाठी फक्त १ रुपया असेल. ही स्कूटर फक्त १० हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता.

आपण इथे Hero Atria LX स्कूटरबद्दल बोलत आहोत ज्याद्वारे तुम्ही फक्त १० हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये फायनान्स प्लॅन अंतर्गत स्कूटर घरी आणू शकता. Hero Atria LX स्कूटरवर उपलब्ध असलेल्या फायनान्स ऑफरबद्दल जाणून घेण्यापूर्वी, Hero Atria LX स्कूटरच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊ या.

Hero Atria LX स्कूटरची वैशिष्ट्ये -

या स्कूटरमध्ये तुम्हाला 250 वॅट्सचा बॅटरी पॅक मिळतो. यामध्ये तुम्हाला 85km ची रेंज मिळते. हे या स्कूटरचे खास वैशिष्ट्य आहे. त्याची पूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे ५ तास लागतात. या स्कूटरमध्ये तुम्हाला 25 kmph चा टॉप स्पीड मिळेल. ही स्कूटर भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्पेसच्या लो-स्पीड सेगमेंटमध्ये येते. यामुळे यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची गरज नाही.

Hero Atria LX वर वित्त योजना जाणून घ्या

Hero Atria LX स्कूटरची किंमत ७१,६९० रुपये आहे. जर तुम्हाला ही स्कूटर घ्यायची असेल तर तुम्ही फक्त 10 हजार रुपये भरून EMI वर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल.

बँक तुम्हाला 61,690 रुपये कर्ज देते. हे कर्ज तुम्हाला २ वर्षांसाठी मिळते. कर्जावर मिळालेल्या पैशावर तुम्हाला ८ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. यानंतर, तुम्हाला 2 वर्षांसाठी 2,790 रुपये EMI भरावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT