Tesla Village Sakal
विज्ञान-तंत्र

गावातील प्रत्येक घरात आहे TESLA कार! नावच पडलंय 'टेस्ला व्हिलेज'

टेस्ला कार जितक्या दमदार, स्टायलिश असतात, तितक्याच त्या महागड्यादेखील असतात.

सकाळ डिजिटल टीम

Tesla Village: टेस्ला कारची जादू जगभरातील अनेक देशांमध्ये चालत आहे. टेस्ला कार घ्यावी ही अनेकांचं स्वप्न असते. परंतु ही कार घेणं तितके सोपं नाही. भारतातही अगदी बोटावर मोजता येईल एवढ्याच लोकांकडे ही कार आहे. टेस्ला कार जितक्या स्टायलिश आणि दमदार असतात, तितक्याच त्या महागड्याही असतात. त्यामुळे टेस्लाची कार पहायला मिळणं तसं कठीण...परंतु कंपनीच्या या गाड्या खूप महाग असल्या तरी एका गावात मात्र प्रत्येक घरात टेस्ला कार आहेत. टेस्ला कारमुळे या गावाला टेस्ला व्हिलेज म्हणून ओळखलं जात आहे. (Every house in this village has a Tesla car, named 'Tesla Village)

चीनच्या युनान प्रांतात हे गाव आहे. अमेरिकेच्या मीडिया सर्व्हिस इलेक्ट्रेकने (Electrek) या गावाचे नाव पंजिगा असल्याचं सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, या गावातील प्रत्येक घरात टेस्लाची कार आहे. गावातील लोक दैनंदिन गरजांसाठीही या गाड्या वापरतात. हे एक डोंगराळ गाव असून गावात जवळपास चाळीस घरे आहेत. या सर्वांकडे टेस्ला कार आहेत.

टेस्लाची कार या सर्वांपर्यंत कशी पोहोचली हेही इलेक्ट्रेकने अहवालात सांगण्यात आले आहे. या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने पहिल्यांदा टेस्ला कार खरेदी केली आणि त्याला ही कार आवडली. ती व्यक्ती गावाबाहेर शहरात राहत असे, पण त्याने गाडी घेऊन गाव गाठले आणि सर्वांना जमवले. त्यांनी त्यांच्या गावातील लोकांशी कारचे कारनामे दाखवले. अखेर काही लोकांना ही कार आवडली आणि त्यांनी त्यात रस दाखवला.

लवकरच, गावातील प्रत्येक घरात टेस्लाची कार विकत घेतली गेली. गेल्या काही आठवड्यांपासून या गावाची चीनी मीडियामध्ये टेस्ला व्हिलेज (Tesla Village) म्हणून चर्चा होत असल्याने गावाचं नावही तेच ठेवण्यात आले. एवढेच नाही तर गावाची लोकप्रियता लक्षात घेऊन येथे स्वत: इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्वाक्षरीचा सुपरचार्जर बसवण्यात आला. सध्या गावात एकूण 40 टेस्ला कार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT