TV Broadband Packages : सध्या भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता, बहुतांश नागरिक सतत देशातील घडामोडींचा मागोवा घेत आहेत. विशेषतः पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ७ मेच्या रात्री एअर स्ट्राइक केली, ज्यामुळे पाकिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर, देशवासीय सतत न्यूज अपडेट्स पाहत आहेत. मात्र मोबाईलवर चालणारे न्यूज व्हिडीओ पाहण्यासाठी हाय-स्पीड इंटरनेटची गरज भासत आहे.
याच गरजेच्या पार्श्वभूमीवर Exicitel या प्रसिद्ध ब्रॉडबँड सेवा पुरवठादाराने ग्राहकांसाठी अत्यंत परवडणारा आणि फायदेशीर ब्रॉडबँड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनद्वारे तुम्हाला 400 Mbps चा भन्नाट वेग मिळणार असून, त्यासोबत २२ ओटीटी अॅप्स आणि ३०० हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा फ्री ऍक्सेसही मिळणार आहे.
जर तुम्ही नेटफ्लिक्स, हॉटस्टार, Zee5, SonyLiv यांसारख्या ओटीटी अॅप्सवर वेब सिरीज, फिल्म्स पाहणे किंवा YouTube वर व्हिडीओ बघणे यामध्ये रस ठेवत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. फक्त 734 रुपये प्रतिमाह या दरात तुम्हाला मिळते आहे 400 Mbps स्पीड, ज्यामुळे गेमिंग, व्हिडीओ एडिटिंगसारख्या हाय डेटा वापराच्या गोष्टीही सहज करता येतील.
त्यासोबत Disney+ Hotstar, SonyLiv, Zee5 यांसारख्या १८ पेक्षा अधिक ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस आणि StarPlus HD, Colors HD, Sony HD यांसारख्या ३००+ लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा फ्री ऍक्सेसही मिळणार आहे. यामध्ये जीएसटी स्वतंत्र राहील हे लक्षात ठेवा
Exicitel ने 200 Mbps चा आणखी एक स्वस्त आणि उपयुक्त प्लॅन देखील सादर केला आहे. फक्त 554 रुपये दरमहिना या दरात मिळणाऱ्या या प्लॅनमध्येही ३०० हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा समावेश आहे. Sony Entertainment, StarPlus, Zee TV यांसारखी लोकप्रिय चॅनेल्स मोफत मिळतात.
तुम्ही अनेक ओटीटी अॅप्ससाठी वेगवेगळ्या सदस्यता घेण्याचा कंटाळा आला असेल, तर Exicitel चा ‘कॅबल कटर’ प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे. या एकाच प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व सुविधा एकत्र मिळतात तेही अत्यंत परवडणाऱ्या दरात.
देशातील सद्यस्थिती लक्षात घेता वेगवान इंटरनेटद्वारे न्यूज चॅनेल्स, लाईव्ह अपडेट्स आणि थेट बातम्या पाहणे आता अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्हीवर उत्कृष्ट दर्जाचा कंटेंट पाहण्यासाठी Exicitel चा हा नवीन ब्रॉडबँड प्लॅन आजच निवडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.