facebook 
विज्ञान-तंत्र

फेसबुक युजर्सचा डेटा लीक; भारतातील 60 लाखांहून अधिक अकाउंटचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - फेसबुकचा डेटा पुन्हा एकदा लीक झाल्याचा प्रकार समोर आला असून यामध्ये जवळपास 100 देशांमधील 533 मिलियय युजर्सचा डेटा लीक झाला आहे. लीक झालेल्या डेटामध्ये युजरचं नाव, जेंडर, व्यवसाय, विवाहित आहे की नाही, रिलेशनशिप स्टेटस, ऑफिस जॉइन केल्याची तारीख इत्यादी माहितीचा समावेश आहे. मध्ये युजर्सच्या खासगी माहिती चोरण्यात आली आणि त्या इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आली. पहिल्यांदा 2019 मध्ये डेटा लीक झाला होता. त्याची विक्री टेलिग्रामवर प्रत्येक सर्चसाठी 20 डॉलर इतक्या दराने होत होती. तेव्हा फेसबुकने सुरक्षेतील त्रुटीमुळे डेटा लीक झाल्याचं म्हटलं होतं. 

गेल्या वर्षी जून 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये पुन्हा डेटा लीक झाला होता. विशेष म्हणजे यावेळीही डेटा लीक आधीसारखाच सुरक्षेच्या त्रुटीमुळे झाल्याचं समोर आलं होतं. या डेटा लीकमुळे युजर्सना एखाद्या व्यक्तीचा नंबर सहज शोधता येतो हडसन रॉक या सायबर सिक्युरीटी फर्मचे सीईओ अॅलन गल यांनी पहिल्यांदा ही बाब निदर्शनास आणून दिली होती.

गल यांनी रविवारी पुन्हा एकदा ट्विटरवून नवीन डेटा लीक झाल्याची माहिती शेअर केली. त्यांनी म्हटलं की, ज्यांचे फेसबुक अकाउंट आहे ते हॅक झाल्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा डेटा लीक झाला असून त्यामध्ये अफगाणिस्तानचे 5.5 लाख युजर्स, ऑस्ट्रेलियाचे 12 लाख युजर्स, बांगलादेशातील 38 लाख युजर्स, ब्राझीलमधील 80 लाख तर भारतातील 61 लाख युजर्सचा डेटा लीक झाला असल्याचा दावा गल यांनी केला आहे. 

डेटा लीक प्रकरणाबाबत प्रतिक्रियेसाठी पाठवण्यात आलेल्या मेलला फेसबुकने अद्याप उत्तर दिलेलं नाही. भारतात गेल्या दहा दिवसात दुसऱ्यांदा असं घडलं आहे. याआधी मोबाइल पेमेंट आणि डिजिटल वॉलेट कंपनी मोबिक्विकच्या युजर्सचा डेटा लीक झाला होता. यातील युजर्सची संख्या तब्बल दहा कोटी इतकी होती. यातील युजर्सची माहिती डार्क वेबवर विकण्यात येत होती. 

डेटा लीकचे प्रकार रोखण्यासाठी भारतात सध्या तरही कोणतीच व्यवस्था नाही. डेटा संरक्षण आणि त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाईची तरतूद नाही. यासंदर्भातील डेटा संरक्षण विधेयक हे 2019 पासून लोकसभेत मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.  या विधेयकावर संसेदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत वाढवून घेतली होती. सध्या माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत जितकी सुरक्षा मिळते ती यासाठी पुरेशी नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT