Facebook Business Loan Updates in India
Facebook Business Loan Updates in India Sakal
विज्ञान-तंत्र

Facebook Business Loan: 50 लाखांपर्यंत कर्ज! कसा करायचा अर्ज?

सकाळ डिजिटल टीम

Facebook Loan: फेसबुक (Facebook) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. फेसबुकचा वापर आपण फोटो, व्हिडिओ आणि विचार शेअर करण्यासाठी करतो. परंतु फेसबुकवरून तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता, हे तुम्हाला माहिती आहे का? होय, तुम्ही कोणत्याही हमीशिवाय (Without Guarantee) फेसबुकवरून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. (Facebook Business Loan Updates in India)

फेसबुकने लघु व्यवसाय कर्ज उपक्रम (Business Loans Initiative) सुरू केला आहे. यासाठी त्यांनी इंडिफी (Indifi) सोबत भागीदारी केली आहे. यापूर्वी फेसबुकने केवळ 200 शहरांमध्ये कर्ज सेवा सुरू केली होती परंतु आता मात्र 329 शहरांमध्ये या सेवेचा विस्तार केला गेला आहे. विशेष म्हणजे हे कर्ज (Loan) घेण्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. या कर्जासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. (Facebook lends up to Rs 50 lakh without any guarantee.)

फेसबुककडून तुम्हाला किती कर्ज मिळते? (How Much Money Do You Get From Facebook?)-

फेसबुक किंवा मेटा स्वतः कर्ज देत नाही, तर कर्ज इंडिफी (Indifi) कंपनी देते. याद्वारे तुम्हाला 2 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जासाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. परंतु कर्जावर 17 ते 20 टक्के वार्षिक व्याज भरावे लागेल. महिला उद्योजकांना व्याजदरात 0.2% सूट मिळेल. एकदा तुमचे कर्ज मंजूर झाल्यानंतर फक्त एका दिवसात पुष्टी मिळेल. उर्वरित कागदपत्रे तसेच औपचारिक गोष्टी पुढील तीन दिवसांत पुर्ण केल्या जातील.

कर्ज कोणाला मिळू शकते? (Who can get Loan?)-

या कर्जासाठी फेसबुकने दोन अटी (condition) ठेवल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय त्यांचा सेवा नेटवर्क असलेल्या भारतीय शहरात असावा आणि दुसरी अट म्हणजे तुम्ही मेटा किंवा फेसबुकशी संबंधित कोणत्याही अॅपशी किमान गेल्या ६ महिन्यांपासून कनेक्ट असायला हवे आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात त्यावर करत असायला हवी. या कार्यक्रमांतर्गत फक्त लहान उद्योजकांनाच कर्ज मिळणार आहे.

असा करा अर्ज (How to apply Online for Facebook Loan?)-

कर्जासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला Facebook Small Business Loans Initiative पेजवर जावे लागेल. तुम्ही Apply Now वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. यावर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित आणखी काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. मागितलेली माहिती भरून ती सादर करावी लागेल. तुम्ही कर्जासाठी पात्र असल्याचे समजल्यास, कंपनी तुमच्याशी संपर्क करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT