Facebook profile checking fact social media information tips marathi news 
विज्ञान-तंत्र

तुमचं फेसबुक प्रोफाइल कोण चेक करतयं  का ? जाणून घ्या

अर्चना बनगे

कोल्हापूर : फेसबुक आता प्रत्येकाचे आवडते सोशल मीडिया साधन बनले आहे. अनेक वेळा असे आपण ऐकतो की आपल्या फेसबुकवर अनेकांची नजर असते खरे तर फेसबुक वापरकर्त्यासाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकते
. फेसबुकच्या माध्यमातून आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवतात असे प्रकार अनेक वेळा पुढे आले आहेत. फेसबुक  वापरकर्त्यांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. आपण जाणून घेऊया की आपले फेसबुक प्रोफाईल कोण कोण पाहत असतात.


आज अनेक जण सोशल मीडियावर भरपूर वेळ घालवत असतात. यातीलच सर्वात मोठे प्लॅटफॉर्म हे फेसबुक आहे. याठिकाणी आपण प्रत्येक जण फोटो आणि व्हिडिओ वारंवार टाकत असतो. त्याच बरोबर तुम्ही कुठे जात असाल तर त्याची माहितीही यावर तुम्ही देत असता. फेसबुक मध्ये ही सामान्य सुविधा आहे. याचा वापर आपण सर्वजण करत असतो. परंतु काहीजण याचा वापर फक्त फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी करत नाही तर नजर ठेवण्यासाठी करताता. आपली माहिती काही जण पाहत असतात. असे अनेकवेळा प्रकार पुढे आले आहेत की फेसबुकच्या माध्यमातून लक्ष ठेवून  फसवणूक करत असतात. जर तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून आपल्यावर कोणीतरी नजर ठेवत आहेत का ही माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही खालील पद्धतीच्या माध्यमातून सहजपणे हे जाणून घेऊ शकता.

या ट्रिक्सचा करा वापर
आपले फेसबुक प्रोफाईल कोणी कोणी पाहिले
 ही माहिती घेण्यासाठी तुम्हाला फेसबुकचे वेब व्हर्जन वापरणे आवश्यक आहे
 
सुरुवातीस तुमचे फेसबुक अकाउंट ओपन करा यासाठी तुम्हाला फेसबुक डॉट कॉम वर लॉग इन करणे आवश्यक आहे.

जेव्हा तुमचे फेसबुक अकाऊंट उघडले जाईल तेव्हा आपल्या फेसबुक अकाउंट च्या उजव्या साईडला क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला विकल्प पर्याय येईल. View Page Source या पर्यायावर तुम्ही क्लिक करा.


पेज सोर्स ओपन झाल्यानंतर तुम्ही CTRL+Fचा वापर करा. 
सर्च बार उघडल्यानंतर तुम्हाला BUDDY_ID  टाईप करावे लागेल त्यानंतर एंटर चे बटन दाबा.


यानंतर तुम्हाला फेसबुक प्रोफाईल आयडी BUDDY_ID दिसेल यातील कोणतेही एक आयडी कॉपी करा आणि नव्या टॅबमध्ये ते उघडा.


यानंतर Facebook.com/15-digit ID लिहून एंटर करा  हे त्या व्यक्तीचे आयडी असेल ज्याने आपले प्रोफाईल उघडून पाहिले आहे.

 आपल्या फेसबुक अकाउंट वरील प्रोफाईल कोणी कोणी पाहिले आहे हे जाणून घेण्यासाठी आणखी काही पर्याय  उपलब्ध आहेत. यासाठी गुगल प्ले स्टोअर वर अनेक ॲप्स दिसून येतात. यातीलच एक Who Viewed My Profile  

ॲप बाबत आपण या ठिकाणी माहिती घेऊया.
 Who Viewed My Profile या ॲपचा वापर पुढील प्रमाणे करावे.

1) सर्वात प्रथम तुम्हाला गूगल प्ले स्टोअर हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. त्यानंतर Instagram, Facebook,WhatsApp  मधील कोणत्याही एका वर तुम्हाला क्लिक करावे लागेल. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तीनही ॲप्स मधील व्हिजिटर च्या बाबत माहिती घेऊ शकता.

2) कोणत्या व्हिजिटर ची माहिती तुम्हाला हवी आहे ते ॲप लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींनी तुमचे आयडी पाहिले आहेत त्यांचे प्रोफाईल दिसतील. त्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर त्यांची नावे तुम्हाला पाहता येतील.

3)नावांचे डायरेक्ट एक्सेस घेण्यासाठी तुम्हाला ऍड फ्री एक्सपिरीयन्स हे प्रो व्हर्जन घ्यावे लागेल.यासाठी तुम्हाला 210 रुपये चार्ज भरावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT