Mark Zuckerberg e sakal
विज्ञान-तंत्र

Facebook च्या माजी कर्मचाऱ्याकडून झकरबर्गच्या राजीनाम्याची मागणी

सकाळ डिजिटल टीम

फेसबुकची माजी कर्मचारी फ्रॉन्सेस हॉगेन (Frances Haugen) यांनी फेसबुकचा संस्थापक आणि सीईओ मार्क झकरबर्गला (Mark Zuckerberg) राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. रिब्रँडींग करण्यापेक्षा मार्कने पदावरून पायउतार व्हावे, असं हॉगनेनं म्हटलं आहे. यापूर्वी त्यांनी फेसबुकच्या कामकाजाबद्दल वेगवेगळे आरोप केले होते.

पोर्तुगालची राजधानी लिसबॉन येथे वेब परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना मार्कने राजीनामा द्यावा का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, ''मार्क झकरबर्ग फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तोपर्यंत कंपनीमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे त्यांनी पायउतार करावे. मार्कऐवजी फेसबुकच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या एखाद्या व्यक्तीने कंपनीचं नेतृत्व करावं. मार्कने राजीनामा दिल्यास ती नवीन व्यक्तीसाठी संधी असेल, असेही हॉगेन म्हणाल्या. याबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे.''

फेसबुकने नुकतेच रिब्रँडींग करत मेटा हे कंपनीचे नाव ठेवले आहे. त्याबाबत देखील हॉगेन यांनी टिप्पणी केली असून यामुळे सुरक्षेच्या मुद्दे सोडवले जातील, असं वाटत नाही. फेसबुककडे आधी जे आहे त्यावर लक्ष देण्यापेक्षा कंपनीचा विस्तार करण्याचा विचार करत आहे, असंही त्या म्हणाल्या.

हॉगेन यांचे आरोप काय? -

''फेसबुक आणि इन्स्टाग्राम अधिक सुरक्षित कसं करता येईल हे कंपनीच्या नेतृत्त्वाला माहित आहे. पण हे बदल ते करणार नाहीत. कारण लोकांपेक्षा गडगंज नफ्याला ते प्राधान्य देतात. कंपनीतील अनेक गोष्टींवर मार्क झकरबर्ग यांचाच अधिकारी असून त्यांच्यावर वचक ठेवणार कोणी नाही'' असेही आरोप त्यांनी केले होते. त्यानंतर फेसबुकचे सीईओ मार्क यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT