Fake App
Fake App eSakal
विज्ञान-तंत्र

Fake App : हॅकर्सनी प्रसिद्ध बँकेच्या नावाने तयार केलं फेक अ‍ॅप; खोट्या ट्रेडिंग अ‍ॅप्सचाही सुळसुळाट.. सरकारचा इशारा!

Sudesh

Union Bank Fake App : सध्या सगळे व्यवहार मोबाईलवरच होताना दिसत आहेत. जवळपास सर्वच बँकांनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अ‍ॅप्स उपलब्ध करून दिले आहेत. मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार देखील घेताना दिसत आहेत. सरकारने सर्व अँड्रॉईड यूजर्सना युनियन बँकेच्या खोट्या अ‍ॅपबद्दल इशारा दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या अ‍ॅपची लिंक तसंच एपीके फाईल सगळीकडे व्हायरल होत आहे. Union-Rewards.apk नावाच्या या फाईलमध्ये बँकेचं खोटं अ‍ॅप दिलं आहे. सायबर दोस्त या सरकारच्या एक्स हँडलने याबाबत पोस्ट केली आहे.

युनियन बँकेच्या नावाने असलेलं हे अ‍ॅप बँकेचं नसून, सायबर गुन्हेगारांचं आहे. युनियन बँकेचं कार्ड वापरल्यानंतर त्यामध्ये असलेले पॉइंट्स रिडीम करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र, हे अ‍ॅप तुमचे बँकिंग आणि कार्ड डीटेल्स चोरी करतं, आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो असा इशारा सरकारने दिला आहे.

ट्रेडिंग अ‍ॅप्सचा सुळसुळाट

यासोबतच सायबर दोस्तने आयफोन यूजर्सना देखील फेक ट्रेडिंग अ‍ॅप्सबाबत इशारा दिला आहे. Group-S नावाचं एक शेअर मार्केट ट्रेडिंग अ‍ॅप सध्या अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप सेबी रजिस्टर्ड नसून, कित्येकांनी त्यामध्ये लाखो रुपये गमावले आहेत. Chu Chi Quoc Huy असं या अ‍ॅपच्या पब्लिशरचं नाव आहे.

याव्यतिरिक्त INSECG, CHS-SES, SAAI, SEQUOIA आणि GOOMI असे कित्येक ट्रेडिंग अ‍ॅप्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्यांचं सेबीकडे रजिस्ट्रेशन झालेलं नाही. त्यामुळे असे अ‍ॅप्स न वापरण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. यासोबतच सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून होणाऱ्या शेअर मार्केट ट्रेडिंगपासून दूर राहण्याचा इशाराही सेबीने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT