Tesla Car Sakal
विज्ञान-तंत्र

Tesla Car: मराठमोळ्या रितेशपासून ते अंबानीपर्यंत... 'या' मोजक्याच भारतीयांकडे आहे टेस्लाची कार

जगभरातल्या अनेक देशांमध्ये टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची विक्री होते. भारतात या कारची थेट विक्री अद्याप सुरू झालेली नसली, तरीही अनेक भारतीयांकडे कंपनीची गाडी पाहायला मिळते.

सकाळ डिजिटल टीम

India's famous Tesla owners: टेस्लाच्याही आधी रस्त्यांवर इलेक्ट्रिक कार धावताना दिसत होत्या. पण टेस्लाच्या कार एवढी चर्चा क्वचितच एखाद्या इलेक्ट्रिक गाडीची झाली. जगभरातल्या अनेक देशांमध्ये टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची विक्री होते. भारतात या कारची थेट विक्री अद्याप सुरू झालेली नाही. परंतु, भारतात असेही काही लोकं आहेत, ज्यांच्या गॅरेजमध्ये टेस्ला कार पाहायला मिळते.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Tesla Car

रितेश देशमुख

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखकडे देखील टेस्लाचे एक्स मॉडेल आहे. या कारला त्याने पत्नी जेनेलियाला भेट दिली होती. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये ५३५ किमी अंतर पार करू शकते.

मुकेश अंबानी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे देखील टेस्लाची कार आहे. अंबानीकडे टेस्लाच्या दोन कार असून, यामध्ये टेस्ला मॉडेल एस१००डी आणि एक्स १००डी चा समावेश आहे. दोन्ही कार्सची किंमत जवळपास दीड कोटी रुपयांपर्यंत आहे.

Tesla Car

पुजा बत्रा

बॉलिवूडअभिनेतीपैकी मोजक्या भारतीय व्यक्तींपैकी एक आहे, ज्यांच्याकडे टेस्लाची कार आहे. पूजाकडे टेस्लाची मॉडेल ३ कार आहे. टेस्ला मॉडेल ३ ची किंमत जवळपास ६० लाख रुपयांपर्यंत आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार ५६० किमी धावते.

प्रशांत रुईया

एस्सार ग्रुपचे सीईओ प्रशांत रुईया यांच्याकडे टेस्लाची कार आहे. प्रशांत टेस्ला कार असणारे पहिले भारतीय आहेत. त्यांच्याकडे टेस्लाचे एक्स मॉडेल आहे. या कारची किंमत जवळपास २ कोटी असून, सिंगल चार्जमध्ये ही कार ४९० किमी अंतर पार करू शकते.

Tesla Car

टेस्लाच्या कार आहेत खास

टेस्लाद्वारे जगातील सर्वात्तम आणि आधुनिक फीचर्ससह येणारी इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली जाते. कंपनीचे मॉडेल एस, एक्स, वाय आणि मॉडेल ३ बाजारात उपलब्ध आङे. या कार्समध्ये ऑटो पायलट मोड, की-लेस अ‍ॅक्सेस, लग्झरी इंटेरियर सारखे फीचर्स मिळतील.

हेही वाचा: Mahindra SUV: ठरलं! 'या' खास तारखेला येतेय Mahindra Thar चे नवे मॉडेल, किंमत फक्त...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT