Fippy MR-2912
Fippy MR-2912 google
विज्ञान-तंत्र

Rechargeable Fan : वीज गेल्यानंतरही ७ तास मिळेल थंड हवा; आजच घरी आणा हा पंखा

नमिता धुरी

मुंबई : राज्याच्या विविध भागांत आजही भारनियमनामुळे वीज पुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत पंखाही बंद होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा पंख्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही वीज गेल्यावरही करू शकता. हा पंखा विजेशिवायही बराच काळ चालतो आणि तुम्ही Amazon India च्या वेबसाइटवरून अगदी सहज खरेदी करू शकता.

या पंख्याचे नाव आहे Fippy MR-2912 रिचार्जेबल बॅटरी टेबल फॅन. या फॅनची किंमत फक्त 3,399 रुपये आहे आणि तुम्ही Amazon च्या वेबसाइटवरून अगदी सहज खरेदी करू शकता. हा पंखा बनवण्यासाठी कॉपर मोटरचा वापर करण्यात आला आहे. हा पंखा तुम्ही भिंतीतही बसवू शकता आणि हवे असल्यास टेबल फॅन म्हणूनही वापरू शकता.

हा पंखा बनवणाऱ्या कंपनीने दावा केला आहे की, वीज गेल्यानंतर हा पंखा एकूण 7 तास चालू शकतो. या फॅनमध्ये एलईडी लाईट देखील देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रकाशाची कोणतीही समस्या येणार नाही. या फॅनला त्याच्या ग्राहकांनी खूप चांगले रिव्ह्यू दिले आहेत आणि जर तुम्हीही हा फॅन विकत घेतला तर तो तुमच्यासाठी खूप स्वस्त ठरू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT