Fastag KYC Update eSakal
विज्ञान-तंत्र

Fastag KYC Update : वाहनचालकांना मोठा दिलासा! 'फास्टॅग' केवायसी अपडेट करण्यासाठी मुदत वाढवली.. जाणून घ्या अंतिम तारीख

E-KYC : ज्या वाहनचालकांनी ई-केवायसी केले नसेल अशांचे ‘फास्टॅग’ ‘डिएक्टिवेट’ होईल. परिणामी त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Fastag KYC Update Deadline : ‘एनएचएआय’ने ‘फास्टॅग’संदर्भात वाहन चालकांना दिलासा दिला आहे. ज्यांनी अद्याप ‘फास्टॅग’चे ‘ई-केवायसी’ केले नाही त्यांना २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या वाहनचालकांनी ई-केवायसी केले नसेल अशांचे ‘फास्टॅग’ ‘डिएक्टिवेट’ होईल. परिणामी त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.

पन्नास टक्केच प्रतिसाद

पुणे शहर व जिल्हातील सुमारे ५० टक्के वाहनचालकांनी ‘फास्टॅग’चे ‘ई-केवायसी’ अद्ययावत केले आहे. ई-केवायसी करताना आधार कार्डसह पॅन कार्डसोबत देखील ‘फास्टॅग’ला लिंक करावा लागणार आहे. देशात १५ फेब्रुवारी २०२१ पासून चारचाकी वाहनांना ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात आले होते.

टोल नाक्यावरील गर्दी कमी व्हावी, टोलसाठी जास्त वेळ लागू नये या हेतूने चारचाकी वाहनांना ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात आले. मात्र यातून देखील समस्या फारशा सुटल्या नाहीत. त्यामुळे आता ई-केवायसीचा हा पर्याय निवडण्यात आला आहे.

असे करा अपडेट

केवायसी अपडेट झाले की नाही, हे पाहण्यासाठी fastag.ihmcl.com या संकेतस्थळावर लॉगइन करा. नोंदणीकृत मोबाईल आणि पासवर्ड अथवा ओटीपीद्वारे लॉग-इन झाल्यावर डॅशबोर्डवर ‘माय प्रोफाईल’वर क्लिक केल्यावर योग्य ती माहिती भरावी लागेल. त्यानंतर अपडेट झाले की नाही हे कळेल. (How to update Fastag KYC)

हवीत ही कागदपत्रे

  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र

  • पासपोर्ट साइज फोटो

  • वाहन परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा.

ही आहे पद्धत

  • बँकेशी जोडलेल्या फास्टॅग वेबसाइटवर क्लिक करणे

  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा वापर करून लॉग इन करणे

  • मोबाईलवरील ओटीपी टाकणे

  • माय प्रोफाइलवर जाऊन केवायसी टॅबवर क्लिक करणे

  • पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरल्यानंतर ‘केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT