Fire Boltt Gladiator  Sakal
विज्ञान-तंत्र

Fire Boltt Smartwatch: भारतीय कंपनीने लाँच केली अ‍ॅपलसारखी स्मार्टवॉच, फीचर्स खूपच जबरदस्त; किंमत कमी

भारतीय कंपनी फायर बोल्टने ( Fire Boltt) ने आपली नवीन स्मार्टवॉच Fire Boltt Gladiator ला लाँच केले आहे. कंपनीची ही वॉच हुबेहुब Apple Watch Ultra सारखी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Fire Boltt Gladiator Smartwatch Launched: भारतीय कंपनी फायर बोल्टने ( Fire Boltt) ने आपली नवीन स्मार्टवॉच Fire Boltt Gladiator ला लाँच केले आहे. कंपनीची ही वॉच हुबेहुब Apple Watch Ultra सारखी आहे. यामध्ये १.९६ इंच डिस्प्ले, १२३ पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग सेंसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. वॉच ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येते. Fire Boltt Gladiator च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Fire Boltt Gladiator ची किंमत

Fire Boltt Gladiator स्मार्टवॉचला तुम्ही ब्लॅक, ब्लू, गोल्ड आणि ब्लॅक गोल्ड रंगात खरेदी करू शकता. या वॉचची किंमत २,४९९ रुपये आहे. वॉचला ३० डिसेंबरपासून Amazon India वरून खरेदी करू शकता.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Fire Boltt Gladiator चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Fire Boltt Gladiator मध्ये ब्लूटूथ कॉलिंगसाठी इनबिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोनचा सपोर्ट देण्यात आला आहे. वॉचमध्ये १.९६ इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला असून, याची ब्राइटनेस ६०० निट्स आहे. वॉच अल्ट्रा-नॅरो फ्रेम डिझाइनसह येते. याचे डिझाइन काहीप्रमाणात अ‍ॅपल वॉच अल्ट्रासारखे आहे. यामध्ये रनिंग, वॉकिंग आणि योगा सारखे १२३ पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहे. वॉटर रेसिस्टेंट आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी वॉचला आयपी६७ रेटिंग मिळाले आहे.

फायर बोल्ट ग्लेडिएटर स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंगसाठी SpO2 सेंसर, स्लिप मॉनिटरिंग आणि फीमेल हेल्थ मॉनिटरिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. वॉच ५ जीपीएस-सपोर्टेड मोडसह येते. यामध्ये जीपीएस रनिंग, जीपीएस वॉकिंग, जीपीएस साइकलिंग, जीपीएस ऑन फुट आणि जीपीएस ट्रायलचा समावेश आहे.

यात ८ वेगवेगळे मेन्यू डिझाइन आणि डायलर अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल दिले आहेत. वॉचमध्ये कॅलक्यूलेटर, वेदर अपडेट आणि अलार्म सपोर्ट मिळेल. सिंगल चार्जमध्ये वॉचची बॅटरी ७ दिवस टिकते. यात क्विक चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे.

हेही वाचा: Smartphone Offer: जुना फोन द्या अन् नवीन घेऊन जा, फक्त ९५० रुपयात मिळतोय Vivo T1X; पाहा ऑफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT