ISRO Gaganyaan Mission 
विज्ञान-तंत्र

ISRO Gaganyaan Mission: इस्रोचे 'गगनयान मिशन'चे पहिले चाचणी उड्डाण रद्द! 'हे' आहे कारण

Sandip Kapde

ISRO Gaganyaan Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज श्रीहरिकोटा चाचणी श्रेणीतून गगनयान मिशन (TV-D1) चे पहिले यशस्वी चाचणी उड्डाण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आलं. आज (शनिवार)  गगनयान मोहिमेसाठी चाचणी उड्डाण TV-D1 प्रक्षेपित करण्यात येणार होते.

मात्र उड्डाणासाठी ५ सेकंद बाकी असताना उड्डाण होल्ड करण्यात आले. यामध्ये तांत्रिक अडचणी आल्याचे इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी स्पष्ट केले. गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची होती. (Latest Marathi News)

गगनयानची पहिली फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (TV-D1) लाँच होल्डवर

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले, "लिफ्ट ऑफ करण्याचा प्रयत्न आज होऊ शकला नाही. इंजिनचे प्रज्वलन (ignition) ठरल्याप्रमाणे झाले नाही, काय चूक झाली हे शोधून काढायला हवे. सुरक्षित आहे, आम्हाला काय झाले ते पाहण्याची गरज आहे...आम्ही लवकरच परत चाचणी घेऊ. कार्यरत असलेल्या संगणकाने लॉन्च थांबवले आहे. आम्ही ते दुरुस्त करू आणि लवकरच लॉन्च शेड्यूल करू.."

एस सोमनाथ म्हणाले की, गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण आज होऊ शकले नाही. सुरुवातीला सकाळी ८ वाजता प्रक्षेपण होणार होते, मात्र खराब हवामानामुळे प्रक्षेपणाची वेळ बदलून सकाळी ८.४५ करण्यात आली. इंजिन योग्यरित्या प्रज्वलित झाले नाही. त्याच्याकडून काय चूक झाली हे आम्ही शोधत आहोत. रॉकेटमध्ये बसवलेले वाहन सुरक्षित आहे. काय चूक झाली हे पाहण्यासाठी आम्ही लॉन्च साइटवर जात आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT