HP Join Hands With Google esakal
विज्ञान-तंत्र

HP Join Hands With Google : भारतात पहिल्यांदाच HP सोबत गूगल बनवणार लॅपटॉप, CEO सुंदर पिचाई यांनी सांगितलं कारण

दोन्ही कंपन्या मिळून भारतात क्रोमबुक लॅपटॉप बनवतील

सकाळ डिजिटल टीम

HP Join Hands With Google : पर्सनल कॉम्प्युटर आणि लॅपटॉप सारखी उपकरणे बनवणारी कंपनी एचपी टेक कंपनीने Google सोबत भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्या मिळून भारतात क्रोमबुक लॅपटॉप बनवतील.हे लॅपटॉप तामिळनाडूतील चेन्नईजवळ एचपीच्या कारखान्यात तयार केले जातील.

कंपनी 2020 पासून या कारखान्यात डेस्कटॉप आणि लॅपटॉप तयार करत आहे.यामुळे गुगलचा भारतात विस्तार होण्यास मदत होईल. यासोबतच डेल आणि असुस सारख्या टेक कंपन्यांच्या विंडोज कॉम्प्युटरशी स्पर्धा करण्यात मदत होईल. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे लॅपटॉप बनवले जातील, असे कंपनीने म्हटले आहे.

भारतात बनवला जाणारा पहिला क्रोमबुक लॅपटॉप

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित कॉम्प्युटर उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे.

मेक इन इंडियाला मिळणार चालना

HP आणि Google ची ही भागीदारी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या कार्यक्रमाअंतर्गत टेक दिग्गज भारतात त्यांचे उत्पादन सुरू करतील. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावादरम्यान कंपन्या चीनबाहेर उत्पादन पर्याय शोधत असल्याने भारत आपल्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राचा विस्तार करत आहे.

सॅमसंग भारतात उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे स्मार्टफोन आधीच देशात तयार केले जात आहेत. सॅमसंग पुढील महिन्यापासून उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील आपल्या कारखान्यात लॅपटॉप बनवू शकते. यामुळे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेला चालना मिळणार आहे.

गेल्या तिमाहीत कॉम्प्युटर बाजारात 15% ने घसरण झाली

IDC च्या मते, भारताच्या वैयक्तिक संगणक बाजारात जून तिमाहीत 15% घसरण झाली. HP 31% मार्केट शेअरसह अव्वल आहे, त्यानंतर Lenovo Group Ltd दुसऱ्या आणि Dell तिसऱ्या स्थानावर आहे.

आयटी व्यापारी सप्टेंबर 2024 पर्यंत परवाना मोफत आयात करू शकतील...

सध्या लॅपटॉप, टॅब्लेट आणि संगणकांच्या आयातीवर कोणतेही बंधन किंवा शुल्क नाही. सध्या, लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटर आयात करण्यासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही. सरकारने म्हटलंय की व्यापारी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ही आयटी उत्पादने परवाना मोफत आयात करू शकतील. याचा अर्थ सरकार या उत्पादनांच्या आयातीवर कोणतेही प्रमाण नियंत्रण टाकणार नाही. डेल, एचपी, अॅपल, सॅमसंग आणि असुस या जागतिक उत्पादकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT