Google  Sakal
विज्ञान-तंत्र

Google Search: सावधान! २०२३ मध्ये गुगलवर सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा होईल जेल

कोणत्याही गोष्टींची माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो. मात्र, चुकीच्या गोष्टी गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला जेल होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

Things You Should Not Be Searching On Google: कोणत्याही गोष्टींची माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो. आजारापासून ते अ‍ॅड्रेसपर्यंत अनेक गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो. मात्र, अनेकदा गुगलवर सर्च करणे महागात पडू शकते. तुम्ही गुगलवर काय सर्च करता हे देखील महत्त्वाचे आहे. गुगलवर काही गोष्टी सर्च केल्यास तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते. गुगलवर काय सर्च करू नये, याविषयी सविस्तर जाणून घ्या.

चाइल्ड पॉर्न

चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत सरकारने कठोर पावले उचलली आहेत. पॉस्को अ‍ॅक्ट २०१२ अंतर्गत चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत गुगलवर सर्च केल्यास ५ ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे चाइल्ड पोर्नबाबत कधीही गुगलवर सर्च करू नये.

बॉम्ब बनवण्याची प्रोसेस

तुम्ही जर गुगलवर बॉम्ब बनवण्याची प्रोसेस सर्च करत असाल तर जेल होऊ शकते. याबाबत सर्च डेस्कटॉप अथवा पोर्टेबल डिव्हाइसच्या आयपी अ‍ॅड्रेसद्वारे ट्रॅक करून कारवाई केली जाते.

पीडितेची माहिती शेअर करणे

लैंगिक छळ अथवा इतर अत्याचाराला बळी पडलेल्या व्यक्तीची खासगी माहिती शेअर करणे देखील गुन्हा आहे. अशा महिलेचे नाव, फोटो व इतर माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

फिल्म पायरसी

तुम्ही जर फिल्म पायरसीचे काम करत असाल अथवा याबाबत गुगलवर सर्च करत असल्यास ३ वर्ष जेल होऊ शकते. यासोबतच, १० लाखांचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.

गर्भपात

Google वर गर्भपात कसा करावा, याबाबत कधीही सर्च करू नये. गर्भपाताबाबत नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही जर गर्भपात कसा करावा याबाबत सर्च करत असल्यास जेल होऊ शकते.

हेही वाचा: Smartphone Offer: कन्फर्म! 200MP कॅमेऱ्यासह येतोय रेडमीचा फोन, 'या' तारखेला भारतात करणार एंट्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena–AIMIM Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिनसेनेची देखील AIMIM सोबत युती

बंडखोरी भोवली! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानंतर मालेगावात भाजपकडून दोन माजी महापौरांची पक्षातून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये वाळू व्यावसायिकांवर ईडीची धाड

लोकशाहीची सुरवात पाश्चात्य देशात नाही तर भारतातील 'या' राज्यात झाली! CM योगी आदित्यनाथांनी दिले पुराव्यांसह उत्तर

Farmer Success Story: अंकितची केळी गेली साता समुद्रापार; युवा शेतकऱ्याच्या श्रमाला मिळाल फळ, अडीच एकरात लाखांचे उत्पन्न..

SCROLL FOR NEXT