flipkart big diwali sale top deals and discount on popular smartphones see price  Google
विज्ञान-तंत्र

Flipkart चा दिवाळी सेल, स्मार्टफोन्सवर मिळतेय ६ हजारापर्यंत सूट

सकाळ डिजिटल टीम

Flipkart वर 'Big Diwali Sale' सुरू झाला असून दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचर करत असाल, तर हा सेल तुमच्यासाठी आहे. या सेलमध्ये सॅमसंग, ओप्पो आणि गुगल व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्स मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. यासोबतच, तुम्ही SBI कार्डने सेलमध्ये पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूटही मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या सेलमध्ये मिळत असलेल्या काही बेस्ट डिल्सबद्दल.

Oppo Reno 6 5G

Oppo चा हा फोन 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह सेलमध्ये उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर त्याची किंमत 29,990 रुपये झाली आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले तसेच फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक डायमेन्सिटी 900 चिपसेट दिला आहे. फोनमध्ये कंपनी 6.43-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला असून फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 64-मेगापिक्सल कॅमेरा आणि समोर 32-मेगापिक्सल कॅमेरा आहे.

Vivo X70 Pro

8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह येणारा Vivo X70 Pro स्मार्टफोन सेलमध्ये तुम्हाला 51,990 रुपयांपेक्षा कमीत म्हणजेच 46,990 रुपयांपर्यंत मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन खरेदी केल्यास 18,950 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ देखील मिळू शकतो. फोनमध्ये कंपनी 6.56-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देत आहे. डायमेंसिटी 1200 प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Samsung Galaxy F42 5G

या Samsung फोनच्या 6GB RAM + 128GB इंटरनल स्टोरेज वेरियंटवर तुम्हाला 6,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. हा फोन तुम्ही आता 23,999 रुपयांऐवजी 17,999 रुपयांना खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास तुम्हाला 14,950 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले दिला आहे, जो 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो.

Google Pixel 4a

Flipkart च्या दिवाळी सेलमध्ये तुम्ही हा Google फोन 31,999 रुपयांऐवजी 25,999 रुपयांना खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर मध्ये फोन घेतल्यास, तुम्हाला 14,950 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये 5.81 इंच फुल एचडी + डिस्प्ले दिला आहे. 12.2 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा असलेल्या या फोनला प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 730G चिपसेट देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

SCROLL FOR NEXT