Flipkart Big Saving Days Sale esakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Big Saving Days Sale : आता फ्लिपकार्टवर मिळणार स्मार्टफोन, टीव्हीवर दमदार डिस्काउंट

10 जूनपासून सुरू झालेला हा सेल 14 जूनपर्यंत चालेल, यामध्ये फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त तुम्हाला बँक ऑफर आणि इतर फायदे देखील मिळत आहेत. चलातर डिटेल्स पाहूया.

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Big Saving Days Sale : फ्लिपकार्टवर एक नवीन सेल सुरू झाला आहे. हा सेल म्हणजे दरवर्षी होणारा फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल असून या सेलमध्ये टीव्ही, स्मार्टफोन, एअर कंडिशनर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स आहेत. 10 जूनपासून सुरू झालेला हा सेल 14 जूनपर्यंत चालेल, यामध्ये फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त तुम्हाला बँक ऑफर आणि इतर फायदे देखील मिळत आहेत. चलातर डिटेल्स पाहूया.

तर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 10 जूनपासून सुरू झाला आहे. हा सेल 14 जूनपर्यंत सुरू राहील. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना एक दिवस आधी म्हणजेच 9 जून रोजी मध्यरात्री 12 वाजता सेलमध्ये प्रवेश मिळाला. विशेष म्हणजे हा सेल स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी बेस्ट आहे. यात Vivo, Redmi, Nothing आणि Apple सारख्या ब्रँडवर सेलमध्ये आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट सेलमध्ये एचडीएफसी बँक आणि कोटक बँक कार्डांवर अतिरिक्त फायदे देखील उपलब्ध आहेत. बँक कार्ड वापरल्यास 10 टक्के सूट मिळेल.

फ्लिपकार्ट सेलमध्ये काय ऑफर आहेत?

या सेलमध्ये तुम्ही अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. यामध्ये, POCO M4 5G डिस्काउंटनंतर अवघ्या 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर तुम्ही iPhone 11 ला सुरुवातीच्या किंमतीत 37,999 रुपयांना खरेदी करू शकता. (Discount Offer)

तुम्ही Google Pixel 6a सवलतीनंतर 25,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसंच Samsung Galaxy F23 5G 13,499 रुपयांना खरेदी करता येईल. तसंच तुम्ही सवलतीनंतर Realme 10 Pro 5G 17,999 रुपयांना खरेदी करू शकता. काही प्रोडक्ट्सवर तर तब्बल 75% पर्यंत सूट दिली गेी आहे. स्मार्टफोनसह स्मार्टटीव्हीवरही दमदार सूट असून तुम्ही 12,499 च्या किमतीत OnePlus स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.

तर थॉमसन स्मार्ट टीव्ही 13,499 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. सॅमसंग आणि एलजी टीव्हीवरही आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर तुम्ही कूलर, वॉशिंग मशीन आणि एसी देखील स्वस्तात खरेदी करू शकता. (Flipkart)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT