Flipkart Big Saving Days Sale esakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Big Saving Days Sale : फ्लिपकार्टचा बंपर सेल सुरू झालाय, ब्रँड्सवर मिळणार खास सवलत

आजकाल सर्वकाही ऑनलाईन

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Big Saving Days Sale : आजकाल सर्वकाही ऑनलाईन मिळतंय. आता भारतात ऑनलाईन ई-कॉमर्स साईट्समध्ये आघाडीची साईट म्हणाल तर फ्लिपकार्ट. दरम्यान याच फ्लिपकार्टने त्यांच्या बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा केली आहे.

या सेलमध्ये सर्वच वस्तूंवर चांगलं डिस्काउंट मिळणार असून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल ४ मे पासून सुरू होईल. दरम्यान यावेळी कंप्युटर्स, वॉशिंग मशीन, एसी अशा गोष्टींवर सूट असणार असून खासकरुन स्मार्टफोन्सवर तगडी सवलत मिळवता येईल. Flipkart वर आगामी सेलमध्ये, वापरकर्ते Realme, Google, Poco या ब्रँडेड स्मार्टफोन्सवर दमदार सूट मिळवू शकतात.

Realme GT Neo 3T

तर रिअलमी कंपनीचा जीटी निओ ३टी हा एक फोन एक मिडरेंजमध्ये चांगला ऑप्शन आहे. याचे फीचर्स म्हणाल तर स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz असून AMOLED डिस्प्ले आहे. तसंच प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह येतो.

या Realme हँडसेटमध्ये एक उत्कृष्ट कॅमेरा सेटअप आहे जो दिवसाच्या प्रकाशात उत्कृष्ट फोटो क्लिक करतो. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असणाऱ्या या फोनची किंमत १९,९९९ रुपये आहे. दरम्यान या फीचर्समधील हा फोन इतक्या कमी प्राईसमध्ये विकत घेण्याची ही एक चांगली संधी आहे.

Google Pixel 6a

गुगलचे फोनही प्रिमीयम फोन म्हणून ओळखले जातात. आता गुगलचा Pixel 6a हा एक उत्तम मिड-रेंज डिव्हाईस आहे ज्यामध्ये Google चा इन-हाउस Tensor G2 चिपसेट देण्यात आला आहे. फोन किमतीप्रमाणे दमदार कॅमेरे ऑफर करतो आणि फ्लॅगशिप फीचर्स यात आहेत. या Google फोनमधील डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60 Hz पर्यंत आहे. जर तुम्ही कमी रिफ्रेश रेटसह स्क्रीनसह येणारा फोन चालवू शकत असाल, तर हा २५,९९९ रुपयांच्या किंमतीत एक दमदार ऑप्शन आहे.

Poco X5 Pro

Poco ने काही महिन्यांपूर्वी Poco X5 Pro हा स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर असलेला स्मार्टफोन लॉन्च केला होता. या हँडसेटमध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक रिअर कॅमेरा आहे. डिव्हाइसमध्ये Android 13 आधारित MIUI 14 देण्यात आला आहे. या यादीतील इतर फोनच्या तुलनेत, बऱ्यापैकी दमदार आहे. कारण सर्व फीचर्समध्ये हा दमदार असल्याने Poco X5 Pro हा एक चांगला ऑप्शन आहे. या फोनची किंमत २०,९९९ रुपये आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT