Samsung Galaxy S23 Gets 49000 rupees discount on Flipkart Now Price Under 40000 Rupees esakal
विज्ञान-तंत्र

Samsung Galaxy S23 5G : सॅमसंग 5G सुपर डिस्काउंट; iPhoneला टक्कर देणारा स्मार्टफोन मिळतोय 40,000 हजारांपेक्षा कमी किंमतीत

Samsung Galaxy S23 Gets 49000 rupees discount on Flipkart : सॅमसंग गॅलेक्सी S23 5G मध्ये 6.1 इंचाचा डायनामिक AMOLED डिस्प्ले आहे. यात HDR10+ सपोर्ट, 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ची प्रोटेक्शन आहे.

Saisimran Ghashi

Samsung 5G Smartphone Discount : मोबाईल मार्केटच्या ऑनलाईन दुनियेत मोठा धमाका झाला आहे. सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोन गॅलेक्सी S23 ची किंमत आता फ्लिपकार्टवर खूपच कमी झाली आहे. आता तुम्ही हा जबरदस्त फोन अगदी 40,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात. त्याचबरोबर या फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा देखील लाभ मिळत आहे.

आधीच आकर्षक आणि प्रीमियम असलेला हा फोन आता आणखी स्वस्त झाल्यामुळे फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. iPhone 14 च्या जोडीने हा दमदार पर्याय ठरू शकेल. ग्लासचा बनविलेला मजबूत आणि स्टायलिश डिझाईन या फोनचे वैशिष्ट्य आहे.

काय आहे ऑफर?

गॅलेक्सी S23 5G ची लाँचिंग किंमत 89,999 रुपये होती. पण आता फ्लिपकार्टवर ही किंमत तब्बल 44 टक्के कमी झाल्याने फक्त 49,999 रुपये इतकी झाली आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळतो. तसेच एचएसबीसी बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास अतिरिक्त 1500 रुपये सूट मिळते.

याशिवाय फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला त्याच्या बदल्यात 40,000 रुपयेपर्यंत सूट मिळू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी S23 5G फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी S23 5G मध्ये 6.1 इंचाचा डायनामिक AMOLED डिस्प्ले आहे. यात HDR10+ सपोर्ट, 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ची प्रोटेक्शन आहे. Android 14 वर चालणारा हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.

फोटोग्राफीच्या शौकीनांसाठी यात 50MP + 10MP + 12MP चा जबरदस्त ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच 12MPचा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्तम आहे. या फोनमध्ये 3900mAh ची बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सॅमसंगने नुकतीच घोषणा केली आहे की आता 'सर्कल टू सर्च' फीचर गूगलच्या सहकार्याने काही निवडक गॅलेक्सी A सीरीजच्या डिव्‍हाइसेस आणि गॅलेक्सी टॅब S9 FE सीरीजसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT