Flipkart Republic Day Sale 2025 esakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Republic Day Sale : खुशखबर! सुरू होतोय फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल; मिळणार 60% पर्यंत महाबंपर डिस्काउंट, ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Flipkart Republic Day Sale 2025 : फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2025 होणार असून स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इलेक्त्रॉनिक्सवर मोठ्या डिस्काउंट्ससह ऑफर्स उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट प्लस मेंबरसाठी 14 जानेवारीपासून विशेष ऑफर सुरु होणार आहेत.

Saisimran Ghashi

Flipkart Sale : रिपब्लिक डेच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने 2025 साठी आपला रिपब्लिक डे सेल जाहीर केला आहे. जानेवारी 14 पासून सुरू होणारा हा सेल ग्राहकांसाठी स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर मोठ्या सवलतींची पर्वणी घेऊन येणार आहे. फ्लिपकार्टचा हा पहिला मोठा विक्री कार्यक्रम असून, ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येत आहे.

14 ते 19 जानेवारी दरम्यान बंपर डिस्काउंट

फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलची सुरुवात 14 जानेवारीला होणार असून, 19 जानेवारीपर्यंत हा सेल चालेल. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना 13 जानेवारीपासूनच या सेलमध्ये खरेदीची संधी मिळणार आहे. प्लस सदस्यांसाठी तब्बल एक आठवडाभर सूट मिळणार आहे.

स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर जबरदस्त ऑफर

या सेलमध्ये स्मार्टफोनप्रेमींसाठी मोठ्या ऑफर्स आहेत. iPhone 16 आणि MacBook Air Mini M2 सारख्या प्रीमियम डिव्हाइसेसवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. तसेच, सॅमसंग गॅलेक्सी S23 आणि S24 5G सीरिजचे स्मार्टफोनही वाजवी किंमतीत खरेदी करता येणार आहेत.

Nothing च्या CMF ब्रँडच्या स्मार्टफोनवर खास ऑफर

CMF Phone 1 (8GB रॅम आणि 128GB स्टोरेज) केवळ ₹14,000 मध्ये खरेदी करता येईल. या फोनची मूळ किंमत ₹16,999 होती.

MacBook Air डिस्काउंट ऑफर

MacBook M2 Air (16GB वेरिएंट) केवळ ₹75,000 मध्ये उपलब्ध असेल. सध्या त्याची किंमत ₹90,000 आहे.

Flipkartने या सेलसाठी आधीच विविध उत्पादनांच्या प्रमोशन्सची तयारी केली आहे. त्यामुळे खरेदी यादी तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर गॅझेट्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळण्याची हमी आहे.

तुमचं बजेट आणि गरजांसाठी योग्य असलेल्या डील्ससाठी सेलच्या तारखांवर लक्ष ठेवा आणि तुमच्या खरेदीला आजच सुरुवात करा!

आम्हाला विचारात घेत नाहीत, अजितदादा ITवाल्यांचं ऐकतात, बैठकीलाही बोलावत नाहीत; हिंजवडीच्या सरपंचांचे गंभीर आरोप

Regulatory Technology: अमेरिकेतील रेग्युलेटरी टेक्नॉलॉजी चा झपाट्याने वाढणारा उद; भारत ह्या संधीपासून दूर तर राहत नाहीये ना?

IND vs ENG 5th Test: खोटारडे! यशस्वीसमोर स्पिनर आणायला घाबरला ऑली पोप, अम्पायरशी बोलला खोटं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates Live: शेकापच्या मेळाव्यात संजय राऊत-राज ठाकरे एकत्र

चक्क 1 रुपयांत रिचार्ज! 'या' कंपनीने दिली सुपर ऑफर; मिळणार अनलिमिटेड कॉल, रोज 2GB डेटा अन् बरंच काही, बघा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT