Flipkart Republic Day Sale Smartphone Discount Offer iPhone Deals esakal
विज्ञान-तंत्र

iPhone Discount Offer : रिपब्लिक डे सेलमध्ये 'या' खास iPhone मॉडेल्सवर 50% डिस्काउंट; ऑफर्स अन् किंमत, पाहा एका क्लिकवर

Flipkart Sale iPhone Discount Offers : फ्लिपकार्टने रिपब्लिक डे सेल 2025 सुरू केली असून, आयफोन, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर उत्पादनांवर 50% पर्यंत सूट मिळवू शकता. फ्लिपकार्ट प्लस आणि VIP सदस्यांसाठी एक्सक्लुझिव डील्स उपलब्ध आहेत.

Saisimran Ghashi

Flipkart Republic Day Sale Smartphone Discount Offer : ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज Flipkart ने २०२५ ची पहिली मोठी सेल जाहीर केली आहे. Flipkart Republic Day Sale 2025 म्हणून ओळखली जाणारी ही सेल आता ‘मॉन्युमेंटल सेल’ या नावाने सुरू झाली आहे. प्लस आणि VIP सदस्यांसाठी १३ जानेवारीपासून सेलचा प्रारंभ झाला आहे, तर इतर ग्राहकांसाठी सेल १४ जानेवारीपासून सुरू होईल. १९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, फॅशन, सौंदर्यप्रसाधने आणि अन्य वस्तूंवर मोठ्या सवलती मिळणार आहेत.

iPhone वर ५०% पर्यंत डिस्काउंट

iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Flipkart च्या या सेलमध्ये आपल्यासाठी आकर्षक ऑफर आहेत. iPhone 16 (128GB) फक्त ६३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल, तर iPhone 16 Pro चा किंमत १,०२,९९९ रुपये असेल.

सॅमसंग गॅलेक्सी S24 Plus (256GB) केवळ ५९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल, तर मोटो एज 50 फ्युजन १९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Apple, Samsung, Motorola, Vivo, Realme आणि Oppo यांसारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर ५०% पर्यंत सवलत आहे.

स्मार्ट टीव्हीवर ६७% पर्यंत सूट

घरातील मनोरंजन अपग्रेड करायचंय? तर हा सेल चुकवू नका. ३२ इंच स्मार्ट टीव्ही ७,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे, तर ४३ इंच UHD स्मार्ट टीव्हीवर ६०% पर्यंत सवलत मिळेल. TCL, Samsung, Mi, Infinix, Sony, Motorola, Vu, Realme आणि Redmi यांसारख्या ब्रँडचे स्मार्ट टीव्ही आकर्षक किमतीत खरेदी करता येतील.

फॅशन, फिटनेस आणि सौंदर्यप्रसाधनांवर भरघोस सवलत

Flipkart च्या मॉन्युमेंटल सेलमध्ये फॅशनवरील ८०% पर्यंत सूट आपल्याला आकर्षित करेल. स्पोर्ट्स शूजवर ५५% पर्यंत सवलत, ट्रॉली बॅग फक्त ४९ रुपयांपासून, तर सौंदर्यप्रसाधनांवर ६५% पर्यंत सवलत मिळेल. फिटनेस उत्पादने ४०% कमी किमतीत खरेदी करता येतील.

लवकर खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष लाभ

Flipkart प्लस आणि VIP सदस्यांसाठी १३ जानेवारीपासून विशेष लाभ मिळत आहेत. इतर ग्राहक १४ जानेवारीपासून या सवलतींचा लाभ घेऊ शकतात.

मोबाईल, टीव्ही, फॅशन आणि गृहउपयोगी वस्तूंसाठी Flipkart ची ही सेल म्हणजे ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा घेत आपल्या आवडत्या वस्तू खरेदी करण्याची संधी सोडू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT