Google Pixel 6a
Google Pixel 6a Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: बंपर डिस्काउंट! अर्ध्या किंमतीत मिळतोय Google चा लेटेस्ट स्मार्टफोन, फीचर्स खूपच जबरदस्त

सकाळ डिजिटल टीम

Offer On Google Pixel 6a Smartphone: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असल्यास तुम्ही Flipkart Sale चा फायदा घेऊ शकता. सध्या फ्लिपकार्टवर Year End Sale सुरू असून, या सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.

३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही Google Pixel 6a स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. या डिव्हाइसवर तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. ऑफरचा फायदा मिळाल्यास तुम्ही फोनला निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता. या फोनवरील ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Google Pixel 6a वर मिळेल बंपर ऑफर

Google Pixel 6a स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत ४३,९९९ रुपये आहे. परंतु, १४ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर २९,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

फोनवर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. Federal Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास यावर तुम्हाला ३ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास गुगल पिक्सल ६ए स्मार्टफोन निम्म्या किंमतीत तुमचा होईल.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Google Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 6a मध्ये ६.१ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. फोन ड्यूल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात १२.२ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि १२ मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.

हँडसेट Google Tensor चिपसेटसह येतो. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. फोन ५जी सपोर्टसह येतो. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी ४४१० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. तसेच, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, ऑल्वेज ऑन डिस्प्ले आणि स्टीरियो स्पीकर सारखे फीचर्स मिळतील.

हेही वाचा: Brain-Eating Amoeba: भारतीयांसाठी किती धोकादायक आहे 'मेंदू' खाणारा व्हायरस? याआधी कोठे आढळलेत रुग्ण? पाहा डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT