Ford Car
Ford Car Sakal
विज्ञान-तंत्र

Ford Car: माइलेजबाबत खोटा दावा करणे फोर्डला पडले महागात, ग्राहकाला द्यावे लागले 'इतके' रुपये

Akash Ubhe

Ford to pay compensation: वाहन कंपन्या अनेकदा अधिक माइलेजची आकडेवारी दाखवत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकदा कंपन्यांनी सांगितलेली आकडेवारी खोटी असल्याचे समोर येते. कंपन्यांनी केला दावा खोटा असतो व ग्राहकांना वाहन चालवताना कमी माइलेज मिळते. असेच एक प्रकरण केरळमध्ये समोर आले असून, यात खोटा दावा केल्याने कंपनीला दंड ठोठवण्यात आला आहे.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

केरळच्या ग्राहक न्यायालयाने वाहन चालकाला ३ लाख रुपये भरपाई देण्यास सांगितले आहे. या वाहन चालकाकडे २०१४ ची फोर्ड क्लासिक डिझेल कार आहे. मात्र, जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे कार माइलेज देत नसल्याचे वाहनचालकाने म्हटले आहे. तपासात देखील कार जाहिरातीत केलेल्या दाव्याच्या तुलनेत ४० टक्के कमी माइलेज देत असल्याचे समोर आले.

केरळ येथे राहणाऱ्या सौदामिनी यांनी याबाबत वाहन निर्माता कंपनी फोर्डविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यांनी २०१४ साली ८ लाख रुपयांना ही कार खरेदी केली होती. कार खरेदी करताना कंपनीच्या अधिकाऱ्याने गाडीचे माईलेज प्रती लीटर ३२ किमी असल्याचा दावा केला होता. मात्र, खरे माइलेज २० किमीपेक्षा कमी असल्याचे समोर आले.

न्यायालयाने याबाबत तपास समिती देखील स्थापन केली होती. त्यानंतर तपासात माइलेज २० किमीपेक्षा कमी असल्याचे आढळले. कंपनीने देखील आपली बाजू मांडत अनेक प्रतिदावे केले. परंतु, न्यायालयाने वाहनचालकाच्या बाजूने निकाल देत कंपनीला भरपाई देण्यास सांगितले. तसेच, फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि Kairali Ford यांनी चुकीचा दावा करत अयोग्य व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT