AI for India 2.0 eSakal
विज्ञान-तंत्र

AI for India 2.0 : आता नऊ भाषांमध्ये मिळणार मोफत एआय प्रशिक्षण; मोदी सरकारने लाँच केली मोठी मोहीम

प्रधान यांनी या उपक्रमासाठी GUVI चे आभार मानले.

Sudesh

सध्या सगळीकडेच एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. त्यामुळेच भविष्यात करिअरच्या लाखो संधी एआयमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने एआय फॉर इंडिया २.० ही मोहीम लाँच केली आहे. (AI for India 2.0)

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी शनिवारी जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त याची घोषणा केली. एआयबद्दलचे सध्याचे बहुतांश कोर्स हे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतातील कित्येक तरुण यापासून वंचित राहत होते. आता या मोहिमेच्या माध्यमातून एआयचे कोर्स नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

भारत हा एक उद्योगप्रिय देश आहे. तसेच, आपला देश आता डिजिटल इंडिया या माध्यमातून भारतातील ग्रामीण क्षेत्रातील तरुणांना देखील एआय प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा कोर्स पूर्णपणे मोफत असल्याचंही प्रधान यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आयआयटी मद्रासची मान्यता

स्किल इंडिया, ग्रॅब युवर व्हर्नॅक्युलर इम्प्रिंट (GUVI), राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (NCVET) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT Madras) या सर्वांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे. इतर संस्थांनी देखील भारतीय भाषांमध्ये टेक्निकल अभ्यासक्रम उपलब्ध करावा असं आवाहन प्रधान यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT