Affordable Laptop Thomson eSakal
विज्ञान-तंत्र

Affordable Laptop : फ्रेंच कंपनी थॉमसन भारतात बनवणार लॅपटॉप; स्मार्टफोनपेक्षाही कमी असणार किंमत!

Thomson Affordable Laptop : पॉकेट फ्रेंडली एंट्री लेव्हल लॅपटॉप बनवण्याच्या उद्देशाने कंपनीने भारतीय आयटी हार्डवेअर मार्केटमध्ये प्रवेश केला आहे.

Sudesh

Thomson Laptops India : मोदी सरकार सध्या 'मेक इन इंडिया' अभियानावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. यासाठीच सरकारने 2020 साली PLI योजनेची सुरुवात केली होती. यामुळे जगभरातील कंपन्या भारतात येऊन उत्पादन करण्यास उत्सुक आहेत. यातच आता फ्रेंच कंपनी Thomson देखील भारतात स्वस्त लॅपटॉप बनवणार आहे.

नोएडामध्ये असणाऱ्या सहस्त्र समूहाला थॉमसन कंपनीने आपली पहिली ऑर्डर दिली आहे. पॉकेट फ्रेंडली एंट्री लेव्हल लॅपटॉप बनवण्याच्या उद्देशाने कंपनीने भारतीय आयटी हार्डवेअर मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

स्मार्टफोनपेक्षा स्वस्त लॅपटॉप

थॉमसन कंपनीचे ग्लोबल जनरल मॅनेजर पिएरे क्रास्नोवस्की यांनी सांगितलं, की सध्या ते एंट्री-लेव्हल लॅपटॉप सेगमेंटवर फोकस करत आहेत. साधारणपणे 19,990 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विंडोज-11 आधारित लॅपटॉप लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. म्हणजेच, एखाद्या अँड्रॉईड स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीमध्ये लॅपटॉप उपलब्ध होणार आहे.

या लॅपटॉपचा वापर प्रामुख्याने विद्यार्थ्यांना करता येणार आहे. हा लॅपटॉप तयार झाल्यानंतर अमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स अशा प्रमुख ई-स्टोअर्सवर उपलब्ध असेल. यासोबतच सरकारी ई-मार्केटप्लेस (GEM) पोर्टलवर देखील हे उपलब्ध करण्यात येतील असं कंपनीने स्पष्ट केलं. पुढील वर्षीपर्यंत हे लॅपटॉप उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (Tech News)

सहस्त्र समूहाचे सीईओ वरुण मनवाणी यांनी सांगितलं, की पहिल्या वर्षात ते एक लाख लॅपटॉप तयार करतील. पीएलआय योजनेचे पात्रता मानदंड पूर्ण करण्यासाठी ते एवढे लॅपटॉप बनवणार आहेत. तसंच, पुढील सहा वर्षांमध्ये या प्रोजेक्टसाठी 250 कोटी रुपये गुंतवणार असल्याचंही समूहाने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT