फळे आणि भाज्या महिलांसाठी हितकारक 
विज्ञान-तंत्र

फळे आणि भाज्या महिलांसाठी हितकारक

वृत्तसंस्था

आहारामध्ये भरपूर पालेभाज्या, फळांचा समावेश असावा, असे नेहमी सांगितले जाते. महिला मात्र याकडे दुर्लक्ष करतात. आता असं दुर्लक्ष करू नका, कारण फळे आणि भाज्या महिलांना हृदयविकारापासून वाचवू शकतात, असे एका नव्या अभ्यासातून दिसून आले आहे. यासाठी अमेरिकेतील अडीच हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला.

ज्या तरुण महिला सकस आहार घेतात त्यांच्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या बंद होण्याचे प्रमाण कमी असते. वाहिन्या बंद झाल्यामुळेच हृदयविकाराचा धोका संभवतो. परंतु हाच नियम पुरुषांच्या बाबतीत लागू होत नाही. शास्त्रज्ञांनाही अजूनही हे कोडे उलगडले नाही. याबाबत बोलताना मिनेपोलिस हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. मायकेल मॅडेमा म्हणाले, ""पुरुषांच्या बाबतीत आहारातील फळे आणि भाज्या परिणामकारक ठरत नाहीत, असे याआधीच्या काही अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र त्याचे शास्त्रीय कारण आम्हाला मिळालेले नाही.'' कमी वयात सकस आहार घेण्याच्या सवयी विकसित करणे महत्त्वाचे असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले. या अभ्यासात सहभागी लोकांच्या खाण्याच्या सवयीसुद्धा लक्षात घेतल्या आणि आणि त्यावरून खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तरुणांवर कसा परिणाम करतात, हे शोधण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Two New Team : पुणेकरांनो आनंद साजरा करा... आयपीएलमध्ये तुमच्या हक्काच्या टीमचे पुनरागमन होतंय? १२ संघांची होणार लीग

Video : तीन मुलांचा पिता असलेल्या मौलानाचा विद्यार्थिनीशी विवाह; जमावाने कोर्टातच केली बेदम मारहाण VIDEO VIRAL

Central Railway: मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! मेल-एक्स्प्रेस, लोकलमध्ये चेन पुलिंगच्या सहा घटना; काय घडलं?

Nagpur News : फटाक्यांच्या ठिणग्यांनी आगीचा भडका ;शहरात ४२ ठिकाणी आगडोंब अग्निशमन दलाची धावाधाव

Latest Marathi News Live Update: गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला

SCROLL FOR NEXT