FSSAI Launched Food Safety Connect App for Consumer Complaints esakal
विज्ञान-तंत्र

FSSAI App : भेसळयुक्त पदार्थांची तक्रार करणे आता तुमच्या हातात ; FSSAI ने लाँच केली 'ही' ऍप

Food Safety Connect App : भेसळयुक्त पदार्थ विक्रीवर आता लागणार लगाम

सकाळ डिजिटल टीम

FSSAI App : देशात अन्नपदार्थातील भेसळ झपाट्याने वाढत आहे. मसाल्यापासून ते मधापर्यंत सर्वच वस्तूंमध्ये भेसळ होत आहे. भाजीपाला हानीकारक रंग देऊन विकला जात आहे. अलीकडेच परदेशात मसाल्याच्या दोन मोठ्या ब्रँडवर बंदी घालण्यात आली आणि ते मसाले परत आले.

या भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनाने अनेक आजार होऊ शकतात. अनेक लोक असे भेसळयुक्त मसाले,भाजीपाला किंवा अन्यपदार्थ खाऊन आजारी पडलेले आहेत किंवा मृत्युमुखी पडण्याच्या देखील अनेक घटना घडल्या आहेत.

खाद्यपदार्थांमधील भेसळ ओळखणे हे खूप कठीण काम आहे. शरीरासाठी हानिकारक असलेल्या अश्या गोष्टी जसे कि भाजीपाला,फळे आपण कधीकधी ओळखू शकतो. पण त्याची तक्रार कुठे करायची असा मोठा प्रश्न ग्राहकांना पडतो.

यावर मार्ग काढण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अश्या फसवणुकीची तक्रार करणे सोपे केले आहे. FSSAI ने एक मोबाईल ॲप लाँच केले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही खाद्यपदार्थातील भेसळीबाबत तक्रार करू शकाल.

फूड सेफ्टी कनेक्ट (Food Safety Connect App) असे या ॲपचे नाव असून तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. या ॲपमध्ये FSSAI परवाना किंवा ब्रँडचा नोंदणी क्रमांक तपासण्याचा पर्याय देखील आहे. या ॲपद्वारे सरकारकडून वेळोवेळी ग्राहकांना सूचनाही दिल्या जातात.

कोणत्याही गोष्टीत भेसळ होत असल्याची तक्रार असल्यास ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे लॉग इन करावे लागेल. तक्रार दाखल केल्यानंतर, तुम्ही तुमच्या तक्रारींवर अपडेट मिळवू शकता. या अँपमुळे ग्राहकांना भेसळयुक्त पदार्थ ओळखणे आणि त्याच्या बद्दलची तक्रार करणे,अपडेट्स मिळवणे सोपे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT