G20 Cyber Attacks eSakal
विज्ञान-तंत्र

G20 : धक्कादायक! ‘जी-२०’च्या संकेतस्थळावर होत होते मिनिटाला लाखो सायबर हल्ले

देशात ‘जी-२०’ परिषदेदरम्यान सुरू केलेल्या संकेतस्थळावर प्रतिसेकंद २६ हजार हल्ले होत होते. परंतु, नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर, सीईआरटी-आयएन व आयफोरसी यांनी एकत्रित प्रयत्न करून हे संकेतस्थळ सुरक्षित ठेवले.

सकाळ वृत्तसेवा

मागील वर्षी भारतात नऊ आणि दहा सप्टेंबर दरम्यान झालेल्या ‘जी-२०’ परिषदेदरम्यान भारत सरकारने सुरू केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रत्येक मिनिटाला १६ लाख सायबर हल्ले होत होते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या वतीने (आयफोरसी) बुधवारी देण्यात आली. ‘आयफोरसी’ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती देण्यात आली.

आयफोरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले, ‘‘देशात ‘जी-२०’ परिषदेदरम्यान सुरू केलेल्या संकेतस्थळावर प्रतिसेकंद २६ हजार हल्ले होत होते. परंतु, नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर, सीईआरटी-आयएन व आयफोरसी यांनी एकत्रित प्रयत्न करून हे संकेतस्थळ सुरक्षित ठेवले.’’

‘जी-२०’ च्या संकेतस्थळावर केलेले हे हल्ले पाकिस्तान आणि इंडोनेशियामधील हॅकर्सकडून करण्यात आल्याचे उघड झाले. देशात २०२३ मध्ये सायबर हल्ल्यांच्या १५.५६ तक्रारी नोंदविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. देशाच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यांत सर्वाधिक सायबर गुन्हे घडत असल्याचेही कुमार यांनी सांगितले. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये देशात झालेल्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण ११३ टक्क्यांनी वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT