ISRO Gaganyaan Mission eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO Gaganyaan Mission : इस्रोच्या 'गगनयान' मोहिमेच्या तयारीला वेग; ड्रोग पॅराशूटची चाचणी यशस्वी!

Drogue Parachute : एखाद्या वेगाने जाणाऱ्या वस्तूला एका झटक्यात न थांबवता, अलगदपणे तिचा वेग कमी करण्यासाठी यांचा वापर करण्यात येतो.

Sudesh

ISRO Gaganyaan Update : एकीकडे चांद्रयान-3 हे चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. तर दुसरीकडे इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेच्या तयारीलाही वेग दिला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच मानवाला अवकाशात पाठवणार आहे. या गगनयानाच्या ड्रोग पॅराशूटची चाचणी इस्रोने यशस्वीपणे पार पाडली आहे.

गगनयानातून अवकाशात गेलेल्या अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ही चाचणी अगदी आवश्यक होती. गगनयानच्या क्रू मॉड्यूलला स्थिर करण्यासाठी हे ड्रोग पॅराशूट कामी येतील. (ISRO Drogue Parachute Test)

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 10 ऑगस्टदरम्यान चंदिगढमध्ये असणाऱ्या टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबमध्ये ही चाचणी घेण्यात आली. याठिकाणी असलेल्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेजचा वापर करुन ड्रोग पॅराशूट तपासण्यात आले. इथल्या सर्व चाचण्या यशस्वी पार पडल्याचं इस्रोने सांगितलं.

कसे असतात ड्रोग पॅराशूट?

एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ADRDE) आणि DRDO यांनी संयुक्तपणे या चाचण्या घेतल्या. ड्रोग पॅराशूटना मोर्टार म्हणूनही ओळखलं जातं. 5.8 मीटर व्यासाचे हे रिबिन सारखे पॅराशूट असतात. हे सिंगल फेज रीफिंग यंत्रणेचा वापर करतात. एखाद्या वेगाने जाणाऱ्या वस्तूला एका झटक्यात न थांबवता, अलगदपणे तिचा वेग कमी करण्यासाठी यांचा वापर करण्यात येतो.

काय आहे गगनयान मोहीम?

या मोहिमेद्वारे इस्रो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) मानवयुक्त अवकाशयान पाठवणार आहे. या मोहिमेसाठी इतर देशांवर अवलंबून न राहता, स्वदेशी क्षमता विकसित करणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या मोहिमेसाठी जाणार्‍या अंतराळवीरांना पृथ्वीवर जशी लाइफ सपोर्ट सिस्टीम असते तशी उपलब्ध करून दिली जाईल, असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT