Call of Duty MW3 launch eSakal
विज्ञान-तंत्र

Call of Duty : 'मॉडर्न वॉरफेअर 3' खेळण्यासाठी MW2 लाँच करणं अनिवार्य; गेमर्स संतापले

COD : ही एकूण प्रक्रियाच अगदी किचकट आणि वेळखाऊ असल्याचं गेमर्सचं म्हणणं आहे.

Sudesh

COD Modern Warfare 3 : कॉल ऑफ ड्यूटी गेम खेळणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. या गेममधील मॉडर्न वॉरफेअर 3 कॅम्पेन नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. मात्र, हे व्हर्जन लाँच करण्यासाठी आधी गेमर्सना मॉडर्न वॉरफेअर 2 लाँच करणं अनिवार्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय ही गेम सुरूच होत नसल्याचं पाहून जगभरातील गेमर्स संतापले आहेत.

पीसीगेमर वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ही गोष्ट तेवढी मोठी वाटत नाही. मात्र, ही एकूण प्रक्रियाच अगदी किचकट आणि वेळखाऊ असल्याचं गेमर्सचं म्हणणं आहे. COD हेडक्वार्टर्सवरुन गेम लाँच करताना ही समस्या येत असल्याचं गेमर्सचं म्हणणं आहे.

नक्की काय आहे समस्या?

जेव्हा गेमर्स Call of Duty HQ वर जातात, तेव्हा तिथून वॉरझोन किंवा मॉडर्न वॉरफेअर 2 याठिकाणी जाणं सोपं आहे. मात्र, मेन मेन्यूमधून जेव्हा गेमर्स मॉडर्न वॉरफेअर 3 या पर्यायावर क्लिक करतात, तेव्हा पूर्ण HQ अ‍ॅपच बंद होतं, आणि एक पूर्णपणे वेगळी विंडो लाँच होते, ज्यामध्ये मॉडर्न वॉरफेअर 3 लोड होऊ लागते.

MW3 थेट लाँच करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया नाही. MW2 लाँच करुन त्यानंतर मॉडर्न वॉरफेअर 3 सुरू करण्याच्या प्रक्रियेत सुमारे दीड मिनिटे वेळ लागत आहे. बॅटल डॉट नेट या ब्लिझार्ड लाँचरवर मात्र ही समस्या येत नसल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळेच COD HQ लाँचरवर गेमर्स वैतागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT