Everything You Need to Know About Car Safety Ratings and NCAP Crash Tests esakal
विज्ञान-तंत्र

Car Safety Ratings : ग्लोबल कार क्रॅश टेस्ट आहे तरी काय? कारची सुरक्षा रेटिंग कशी ठरवली जाते,पाहा

Global NCAP Crash Testing Process : अलीकडेच, ग्लोबल एनसीएपी (Global NCAP) या आंतरराष्ट्रीय सुरक्षा रेटिंग एजन्सीने भारतातील काही कारच्या सुरक्षिततेचा आढावा घेऊन यादी जाहीर केली आहे.

Saisimran Ghashi

Car Safety Ratings and NCAP Crash Tests : अलीकडेच, ग्लोबल एनसीएपी (Global NCAP) या आंतरराष्ट्रीय सुरक्षा रेटिंग एजन्सीने भारतातील काही कारच्या सुरक्षिततेचा आढावा घेऊन यादी जाहीर केली आहे. यात स्कोडा स्लाव्हिया, कुशाक आणि फोक्सवॅगन तैगुन, व्हरटस या कार्सना 5 स्टार रेटिंग मिळाले आहे, तर मारुतीच्या Alto K10 आणि WagonR ला सर्वात कमी स्टार रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, एका कारला सुरक्षा रेटिंग कशी दिली जाते? आणि त्या पाठीमागे काय पॅरामीटर्स आहेत?

ग्लोबल एनसीएपी काय आहे?

ग्लोबल एनसीएपी (New Car Assessment Program) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी जगभरातील नवीन कार्सच्या सुरक्षिततेची तपासणी करते. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे कार सुरक्षित बनवणे आणि ग्राहकांना कारच्या सुरक्षिततेची योग्य माहिती पुरवणे. ग्लोबल एनसीएपी कारची क्रॅश टेस्ट करून त्या कारची सुरक्षितता मोजते आणि त्यानुसार रेटिंग देण्यात येते.

कार क्रॅश टेस्ट कशी केली जाते?

क्रॅश टेस्टसाठी, कारला ठराविक वेगाने चालवून समोर किंवा बाजूने बॅरियरला धडकवले जाते. टेस्टदरम्यान कारच्या आत ड्रायव्हिंग सीटवर डमी बसवली जाते. उदाहरणार्थ, फ्रंटल टेस्टमध्ये कार समोरून 64 किमी प्रति तास वेगाने बॅरियरला धडकते. तसेच साईड, रिअर आणि पोल टेस्ट केल्या जातात. या वेगवेगळ्या चाचण्यांमधून वाहनाच्या बाह्य आणि अंतर्गत संरचनेची तपासणी करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गुण दिले जातात.

कोणते पॅरामीटर्स तपासले जातात?

ग्लोबल एनसीएपीकडून कारला ० ते ५ स्टारपर्यंत सुरक्षा रेटिंग दिले जाते. रेटिंग जितके जास्त, तितकी कार सुरक्षित मानली जाते. हे रेटिंग प्रौढ संरक्षण (Adult Occupant Protection) आणि बाल संरक्षण (Child Occupant Protection) या दोन मुख्य पॅरामीटर्सवर आधारित आहे. प्रौढ संरक्षणात, प्रवाशांच्या डोकं, मान, छाती, गुडघे, पाय आणि शरीराच्या इतर भागांना झालेल्या संभाव्य जखमांचे मूल्यांकन केले जाते. तसेच बाल संरक्षणात, कारमध्ये लहान मुलांसाठी वापरण्यात आलेल्या सीट बेल्ट, चाइल्ड सीट यासारख्या सुविधांची तपासणी केली जाते.

प्रौढ आणि बाल संरक्षणासाठी गुण कसे दिले जातात?

प्रौढांच्या संरक्षणासाठी एकूण 17 गुण निश्चित आहेत, जे प्रवाशांच्या वेगवेगळ्या अवयवांच्या सुरक्षिततेवर आधारित आहेत. यामध्ये डोकं, मान, छाती, पाय यांचा समावेश आहे. बाल संरक्षणासाठी 49 गुण आहेत, ज्यामध्ये 18 महिने आणि 3 वर्षांच्या मुलांच्या आकाराच्या डमींचा वापर करून त्यांची सुरक्षितता तपासली जाते. चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम, थ्री पॉइंट सीट बेल्ट, आणि ISOFIX या बाल सुरक्षितता सुविधांनुसार अतिरिक्त गुण दिले जातात.

ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश चाचण्या आणि त्यांच्या कठोर पॅरामीटर्समुळे ग्राहकांना कारची खरी सुरक्षितता कळते. त्यामुळे, कार खरेदी करताना तिची सुरक्षा रेटिंग तपासूनच योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT