Gmail Esakal
विज्ञान-तंत्र

Gmail Down: जगभरात जीमेलची सेवा ठप्प, मेल पाठवताना येतेय समस्या; नेटकऱ्यांनी ट्विटरवर मांडली तक्रार

दिग्गज टेक कंपनी गुगलची (Google) ईमेल सेवा जीमेल ठप्प झाली आहे. अनेक यूजर्सला जीमेलवरून मेल पाठवताना अडचण येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gmail Down Across Globe: दिग्गज टेक कंपनी गुगलची (Google) ईमेल सेवा जीमेल ठप्प झाली आहे. अनेक यूजर्सला जीमेलवरून मेल पाठवताना अडचण येत आहे. जीमेलचे अ‍ॅप आणि डेस्कटॉप व्हर्जन दोन्हीही वापरताना लाखो यूजर्सला समस्या येत आहे. अनेक यूजर्सने मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर जीमेल डाउन झाल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

अनेक यूजर्सला जीमेल लॉग इन करताना अडचण येत आहे. डाउन डिटेक्टरनुसार, जवळपास १ तासापासून यूजर्सला जीमेल वापरताना समस्या येत आहे. यूजर्सला जीमेल अ‍ॅप आणि डेस्कटॉप व्हर्जन दोन्हीवरून मेल पाठवता येत नाहीये. जगभरातील जीमेलच्या लाखो यूजर्सला याचा फटका बसला आहे. जीमेल डाउन झाल्यानंतर गुगलकडून देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. 'जीमेल सेवा वापरताना यूजर्सला अडचण येत असून, लवकरच ही समस्या सोडवली जाईल', असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.

सॉफ्टवेअर अपडेटमुळे ही समस्या आल्याचे सध्या सांगितले जात आहे. जीमेलची सेवा ठप्प झाल्यानंतर अनेक यूजर्सने ट्विटरवर तक्रार केली आहे. ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #GmailDown ट्रेंड होत आहे.

जगभरात जीमेल वापरणाऱ्या यूजर्सची संख्या १.५ अब्जपेक्षा जास्त आहे. हे वर्ष २०२२ मध्ये सर्वाधिक वेळा डाउनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅपपैकी एक आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हिस देखील डाउन झाली होती. मात्र, काही वेळातच ही सेवा पुन्हा सुरू झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT