gmail storage free up space tips esakal
विज्ञान-तंत्र

Gmail Tricks : जीमेल स्टोरेज फुल झालंय? या सोप्या ट्रिकने मिळवा फ्री स्पेस

Gmail Storage Clear Tips Spam Mail : आम्ही तुम्हाला या Gmail स्टोरेज फुल आणि स्पॅम मेलच्या समस्येवर मात करण्यासाठी 5 सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहजपणे स्पॅम ईमेल्सला रोखू शकाल.

Saisimran Ghashi

Tech Tips : तुमच्या जीमेल इनबॉक्समध्ये आवश्यक ईमेल्स दिसत नाहीयेत का? कदाचित, स्पॅम ईमेल्समुळे तुमचं इनबॉक्स भरलेलं असू शकतं. या अनावश्यक ईमेल्समुळे महत्त्वाचे ईमेल्स चुकू शकतात आणि त्यासोबतच तुमच्यावर फसवणूक किंवा मालवेअरचा धोका देखील वाढतो. दररोज सरासरी 4-5 स्पॅम ईमेल्स मिळतात, आणि त्यांना एक एक करून डिलिट करत बसण खूपच त्रासदायक असतं. त्यामुळे या अनावश्यक ईमेल्सपासून कसं वाचावं याच्या सोप्या ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आम्ही तुम्हाला या जीमेल स्टोरेज फुल आणि स्पॅम मेलच्या समस्येवर मात करण्यासाठी 5 सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहजपणे स्पॅम ईमेल्सला रोखू शकाल.

1. स्पॅम ईमेल्स ब्लॉक करा

  • जीमेल उघडा.

  • ज्याला तुम्ही ब्लॉक करायचं आहे, तो ईमेल निवडा.

  • ईमेलच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या "More" किंवा "i" चिन्हावर क्लिक करा.

  • "Block" वर क्लिक करा आणि पुष्टी करा.

  • यामुळे त्या प्रेषकाचे सर्व पुढील ईमेल्स थेट स्पॅम फोल्डरमध्ये जातील.

2. अनावश्यक ईमेल्समधून अनसबस्क्राइब करा

  • जीमेल उघडा.

  • अनसबस्क्राइब करायचा असलेला ईमेल उघडा.

  • खालील बाजूस "Unsubscribe" किंवा "Change Preferences" लिंक शोधा.

  • त्यावर क्लिक करून अनसबस्क्राइब प्रक्रिया पूर्ण करा.

  • यामुळे तुम्हाला त्या प्रेषकाकडून पुन्हा ईमेल्स मिळणार नाहीत.

3. जीमेल फिल्टर्सचा वापर करून स्पॅम ओळखा

  • जीमेलमध्ये "Unsubscribe" शब्द शोधा.

  • हवे असलेले ईमेल निवडा आणि "Filter Messages Like These" वर क्लिक करा.

  • पुढील स्पॅम ईमेल्ससाठी योग्य कृती निवडा जसे की "Delete", "Mark as Spam", इत्यादी.

4. स्पॅम ईमेल्स मोठ्या प्रमाणात काढा

जीमेल उघडा आणि "Inbox" टॅबवर जा.

"Select All" क्लिक करा आणि सर्व स्पॅम ईमेल्स निवडून त्यांना डिलीट करा.

हे सोपे उपाय वापरून तुम्ही सहजपणे स्पॅम ईमेल्सवर नियंत्रण मिळवू शकता आणि तुमचं इनबॉक्स स्वच्छ ठेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT