Gold Iphone esakal
विज्ञान-तंत्र

Gold Iphone : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने का मागवले 35 गोल्ड आयफोन? किंमत ऐकून होईल बत्ती गूल

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने FIFA वर्ल्डकप 2022 मधील संघाचा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला

सकाळ डिजिटल टीम

Gold Iphone : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने FIFA वर्ल्डकप 2022 मधील संघाचा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. आणि त्यासाठी मेस्सीने एकूण 35 गोल्ड आयफोन मॉडेल्सची ऑर्डर दिली आहे. आणि हे आयफोन त्याने घेतले आहेत त्याच्या टीम मेंबर्स आणि सपोर्ट स्टाफला भेट म्हणून देण्यासाठी

गोल्ड आयफोन मॉडेल्सची किंमत

लिओनेल मेस्सीने दिलेल्या 35 ऍपल आयफोन मॉडेल्सच्या ऑर्डरच्या एकूण किमतीबद्दल सांगायचं झाल्यास, फुटबॉल स्टार मेस्सीने यासाठी 1 लाख 75 हजार युरो मोजले आहेत. इंडीयन करन्सी मध्ये जर याची किंमत सांगायची झालीच तर मेस्सीने सुमारे 1 कोटी 73 लाख रुपये या फोन्ससाठी मोजलेत.

द सनच्या वृत्तानुसार, या गोल्ड आयफोनच्या मागील बाजूस केवळ खेळाडूचं नावच नाही तर त्याचा जर्सी क्रमांक आणि अर्जेंटिनाचा लोगो देखील असेल. यासोबतच रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलंय की, या वीकेंडपर्यंत हे ३५ गोल्ड आयफोन मॉडेल फुटबॉल स्टार मेस्सीच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचवले जातील.गोल्ड आयफोन मॉडेल कोणते आहेत?

मेस्सीने त्याच्या प्रत्येक टीम मेंबर आणि सपोर्ट स्टाफसाठी ऑर्डर केलेला गोल्ड आयफोन हा iPhone 14 आहे. मेस्सीला लवकरच जो फोन मिळणार आहे, त्याचा फोटो iDesign Gold च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या फोटोमध्ये फोनचं डिझाईन रिव्हील करण्यात आलंय..

लिओनेल मेस्सीने वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली

2022 च्या FIFA विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून FIFA विश्वचषक 2022 जिंकला होता, एवढेच नाही तर मेस्सीची ही पहिली वर्ल्डकप ट्रॉफी होती. मेस्सीला हा क्षण साजरा करण्यासाठी काहीतरी खास करायचं होतं आणि त्यासाठी त्याने उद्योगपती बेन लियॉनशी संपर्क साधला आणि नंतर त्यांनी एकत्रितपणे हे फोन डिझाइन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT