Google Search Update eSakal
विज्ञान-तंत्र

Google Search Update : गुगलने सर्च ऑप्शनला दिले तीन नवे अपडेट्स! यूजर्सना होणार मोठा फायदा

Google Features : या फीचर्समुळे यूजर्सना अधिक वेगाने आणि चांगल्या प्रकारे सर्च रिझल्ट मिळणार आहेत.

Sudesh

गुगल सध्या एआयवर जोमाने काम करत आहे. आपल्या सर्च इंजिनमध्ये एआयच्या मदतीने गुगलने कित्येक नवीन फीचर्स अ‍ॅड केले आहेत. यामुळे यूजर्सना एखादी गोष्ट सर्च करताना अधिक चांगल्या प्रकारे सर्च रिझल्ट मिळणार आहेत.

नुकतेच गुगलने आपल्या सर्च ऑप्शनसाठी तीन नवे फीचर्स लाँच केले आहेत. यामुळे यूजर्सना अधिक वेगाने आणि अधिक चांगल्या प्रकारे सर्च रिझल्ट मिळणार आहेत.

पब्लिशिंग डेट

गुगलने एक महत्त्वाचं फीचर आपल्या सर्च रिझल्टमध्ये अ‍ॅड केलं आहे. या फीचरमुळे एखाद्या लिंकसोबत यूजर्सना ती कोणत्या दिवशी प्रकाशित झाली याची तारीखही दिसणार आहे. त्यामुळे यूजर्स अधिक नवीन आणि अपडेटेड आर्टिकल शोधू शकतील.

ओव्हरव्ह्यू सेक्शन

गुगलवर एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर ओव्हरव्ह्यू सेक्शनमध्ये तुम्हाला हवी असणारी नेमकी माहिती मिळते. याठिकाणी आतापर्यंत केवळ टेक्स्ट किंवा इमेज देण्यात येत होती. मात्र, आता याठिकाणी तुम्हाला व्हिडिओही पहायला मिळणार आहेत. हे व्हिडिओ आपोआप प्ले देखील होतील.

उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्ही जर गुगलवर एखाद्या योगासनाबाबत सर्च केलं. तर त्याची केवळ माहितीच नाही, तर ते आसन सादर करतानाचा व्हिडिओही ओव्हरव्ह्यूमध्ये दिसणार आहे.

अधिक वेगाने रिझल्ट्स

गुगलने आपल्या SGE मध्ये मोठी सुधारणा केली आहे. यामुळे आता एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर अधिक जलद गतीने ओव्हरव्ह्यू रिझल्ट्स लोड होणार आहेत. आधीच्या तुलनेत निम्मा वेळ हे लोड होण्यासाठी लागणार आहे.

कोणाला मिळणार फीचर्स

गुगलने हे फीचर्स सध्या अशा यूजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहेत, ज्यांनी गुगल लॅबचं सबस्क्रिप्शन घेतलं आहे. येत्या काळामध्ये हे फीचर कंपनी कदाचित सगळ्या यूजर्ससाठी उपलब्ध करून देऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT